शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या खंडामुळे परभणी जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:10 IST

पावसाने दिलेल्या सलग २५ दिवसांच्या खंडामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत.

परभणी : पावसाने दिलेल्या सलग २५ दिवसांच्या खंडामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील ७ लाख शेतकऱ्यांची या हंगामावर भिस्त असते. हे शेतकरी दरवर्षी खरीप हंगामात पाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करतात. यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाकडून ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. कृषी विभागाने केलेल्या नियोजनावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. जून, जूलै व आॅगस्ट या तीन महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसावर खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद ही पिके बहरली; परंतु, त्यानंतर पावसाने दिलेल्या खंडाने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे उडीद व मूग ही पिके हातची गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार ही खरीप हंगामातील २ लाख ११ हजार ७७२ हेक्टरवर पेरणी झालेल्या सोयाबीन व १ लाख ५८ हजार ८८ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेल्या कापूस लागवडीवर अवलंबून होती; परंतु, जिल्ह्यामध्ये २० व २१ आॅगस्टनंतर दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची बहरात आलेली साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व कापूस ही पिके धोक्यात आली आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिकांची परिस्थिती नाजूक झाली असून, कृषी विभागाने पंनचामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

नैसर्गिक संकटात सापडला शेतकरी जिल्ह्यात १ लाख ५८ हजार ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. सध्या कापूस पीक बहरले आहे. कृषी विभागाकडून बोंडअळीच्या संकटाला तोंड देण्यासाठी क्रॉपसॅप अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली; परंतु, या पाहणीत अधिकाऱ्यांना विदारक चित्र दिसून आले. याबाबत कृषी विभागाने कसोटीचे प्रयत्न करीत बोंडअळीस नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु, पावसाच्या खंडामुळे कापूस पिकावर रोगाचा प्रादूर्भाव ‘जैसे थे’ असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला आहे.  

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी