शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शासन नोंदीत अतिवृष्टी झालेल्या गावच्या विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 19:52 IST

एकीकडे पूर तर दुसरीकडे कोरड्या विहिरी

पूर्णा (परभणी) :  तालुक्यातील चुडावा मंडळात शासनाच्या दफ्तरी  अतिवृष्टीची नोंद आहे. मात्र, अजूनही या गावातील विहिरी कोरड्या पडलेल्या दिसून येत आहेत. 

राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती भयावह आहे.मात्र, मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटली तरी तालुक्यातील अनेक भागात पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. यातच चुडावा मंडळात  दि. 3 ऑगस्टला बारा तासात 71 मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. या पावसामुळे हा भाग अतिवृष्टीमध्ये नोंदवण्यात आला. परंतु, या भागातील स्थिती अतिशय बिकट आहे. 

अगोदरच या भागात पाऊस नसल्याने खरीप पेरण्या उशिरा झाल्या. अनेकांच्या पेरण्या ही झाल्या नाही. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या भरवश्यावर पेरण्या केलेली  पिके आज जरी तग धरून दिसत आहेत. पुढील काळात पुरेसा पाऊस न पडल्यास ही पिकेही हातातून जाण्याची शक्यता आहे.शुक्रवारी एकीकडे पूरस्थितीच्या झळकत असताना या परिसरात कोरड्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. येथील शेतकरी कैलास ज्ञानेशवर देसाई,गजानन जळबाजी देसाई,दिनकर बालासाहेब देसाई,रमेश बालासाहेब देसाई यांच्या समाईक विहिरीचे खोदकाम चालू असून राज्यातील विसंगत स्थितीचे विदारक दर्शन घडून येत आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. जल स्त्रोताना अजून पाणी आले नाही. भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी या भागात मोठया पावसाची गरज आहे. - किशोर देसाई, युवा शेतकरी

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसdroughtदुष्काळ