शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद चालकामुळे दोघांचे प्राण गेले; भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

By ज्ञानेश्वर भाले | Updated: October 20, 2022 18:06 IST

न्यायालयीन काम आटोपून दुचाकीवरून परताना टेम्पोने उडवले; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

ताडबोरगाव (जि. परभणी) : आयशर टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पाथरी-परभणी महामार्गावरील किन्होळा पाटीनजीक घडली.

सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथील रहिवासी असलेले बालाजी भारत गायकवाड (२५) व भाऊसाहेब महादेव सागडे (२३) हे परभणी येथील न्यायालयीन काम आटोपून दुचाकी क्र. (एमएच २२ एजे ११६७) वरून सेलूकडे परतत होते. महामार्गावरील किन्होळा पाटीनजीक समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोसोबत ( क्र. एमएच ४२ बीएफ ५४१०) त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील महादेव सागडे व बालाजी गायकवाड हे दोघे जागीच ठार झाले. 

अपघातानंतर सदरील टेम्पो शेजारील शेतात शंभर फूट आतमध्ये गेला होता. दरम्यान, घटनेची माहिती कळताच परभणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, पोलीस उपनिरीक्षक भीमराव कदम, स्वाती कावळे, पोलीस कर्मचारी सूर्यकांत फड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन टेम्पोच्या मद्यधुंद चालकास ताब्यात घेतले.

जमावाकडून टेम्पो पेटवून देण्याचा प्रयत्न घटनास्थळी मृतांच्या नातेवाइकांनी आयशर टेम्पो पेटवून देण्याचा प्रयत्न केला असता सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांनी जमावाला शांत करून आयशर ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा केला. तर मृतांना उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत परभणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूparabhaniपरभणी