शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

Drought In Marathwada : टँकरच्या मागणीसाठी महिला आणि ग्रामस्थांनी ग्रामसेवकास ठेवले ओलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 19:42 IST

तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने अखेर ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली.

गंगाखेड (परभणी ) : तालुक्यातील खंडाळी गावात टँकर सुरु करण्याच्या मागणीसाठी महिला आणि ग्रामस्थांनी आज ग्रामसेवकास घेराव घालून समाजमंदिरात बसवून ठेवले. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने तीन तासानंतर ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली.

खंडाळी गावात पाणीटंचाई असल्याने पाण्याचा टँकर सुरू करण्याबाबत जानेवारीमध्ये ग्राम पंचायतीत ठराव घेण्यात आला. त्यांनतर पंचायत समितीकडे हा प्रस्ताव सादर करून सुद्धा टँकर सुरू झाले नाही. किरकोळ त्रुटी दाखवून प्रस्ताव परत पाठविण्यात येत असल्याने महिला आणि ग्रामस्थ संतप्त झाले. यामुळे आज सकाळी गावात आलेले ग्रामसेवक एम.व्ही. नवटके यांना घेराव घालत जाब विचारला. तसेच याबाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत गावातील समाजमंदिरात बसवून ठेवले. 

ही माहिती समजताच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविण सुराडकर, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी भ्रमणध्वनीवरून ग्रामस्थांशी संवाद साधला. पाणी टंचाई लक्षात घेता गावाला भेट देऊन टँकर सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती दिली. यानंतर तब्बल तीन तासानंतर ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली. या आंदोलनात तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तराव पवार, राजाराम पवार, सरपंच मोतीराम कोल्हे, कोंडीबा जंगले, माजी सरपंच सदाशिव भोसले, नितीन पवार, गंगाराम भोसले, बाबुराव भोसले, रामकीशन जंगले, सखाराम जंगले, अंजनाबाई माळवे, रंभाबाई हासले, वैशाली जंगले, छायाबाई जंगले, सुशिला जंगले, संगीता पवार, सागरबाई कोल्हे, मुक्ताबाई कोल्हे, जनाबाई भोसले, राधाबाई भोसले, भगवान भोसले, नारायण भोसले, बाळू सूर्यवंशी, राम कोल्हे, श्रीरंग भोसले, माधव सूर्यवंशी आदींचा सहभाग होता. 

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळparabhaniपरभणी