ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनने ३ ते ५ सप्टेंबर या काळात ही स्पर्धा घेतली. या स्पर्धेत जिल्ह्यातून १४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यात सिद्धेश रवी पवार या पाच वर्षांच्या खेळाडूने, तर ओमकार दिलीप तिडके या खेळाडूने काठी फिरवणे या प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. लाठीकाठी, तलवार चालविणे, भाला फिरविणे अन् स्टिक फाइट आदी खेळ प्रकारांचा यात समावेश होता. जिल्ह्यातील पदक प्राप्त खेळाडूंमध्ये सुरेश पवार, आर्यन नव्हाट, जय कदम, दत्ता पानपट्टे, श्रीगणेश नागरगोजे, ओमकार तिडके, भीमाशंकर तिडके, शिवशंकर तिडके, भाग्यश्री तिडके, ज्ञानेश्वरी तिडके, गंगासागर गबाळे, वैष्णवी तरटे, निकिता पानपट्टे या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक बाळासाहेब माने, मुंजाजी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत जिल्ह्याने पटकावली २ पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST