परजिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:52+5:302021-03-23T04:18:52+5:30

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असून, हा संसर्ग रोखण्यासाठी नोकरीच्या निमित्ताने अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ...

District entry ban on district officers and employees | परजिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रवेशबंदी

परजिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रवेशबंदी

Next

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असून, हा संसर्ग रोखण्यासाठी नोकरीच्या निमित्ताने अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. बाहेर जिल्ह्यात जाण्यास कर्मचाऱ्यांना बंदी घातली आहे. तसेच बाहेर जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी हे आदेश काढले.

मास्क न वापरल्यास आता क्वारंटाइन

परभणी : मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आल्यास संबंधितास ताब्यात घेऊन त्याला एक दिवसासाठी क्वारंटाइन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी प्रशासन उपाय करीत असताना नागरिक मात्र त्याचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. परभणी शहरात मास्क न वापरता फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तीस ताब्यात घेऊन रेणुका मंगल कार्यालयात एक दिवसासाठी क्वारंटाइन करण्यात येणार असून, या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणीही केली जाणार आहे.

Web Title: District entry ban on district officers and employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.