जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. पॅनल तयार करून बँक ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात वातावरण तापणार आहे.
१५ केंद्रांवर होणार मतदान
परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण १५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परभणी येथे २ केंद्रे असून, पूर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, सेलू, पाथरी, मानवत, जिंतूर आणि हिंगोली जिल्ह्यांतील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव याठिकाणी प्रत्येकी एका केंद्रावर मतदान होणार आहे.
दीड हजार मतदार बजावणार हक्क
या निवडणुकीसाठी १ हजार ५६९ मतदार आहेत. त्यात प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था व धान्य अधिकोष सहकारी संस्था मतदारसंघात ९७८, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था मतदारसंघात ६९ आणि इतर शेती संस्था मतदारसंघात ५२२ मतदारांचा समावेश आहे.