शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लवकर नाष्टा मागणे जिवावर बेतले; हॉटेल चालक, वेटरच्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 15:24 IST

याप्रकरणी मुख्य आरोपीसह चौघांना जिंतूर पोलिसांनी अटक केली आहे.

जिंतूर (परभणी) : हॉटेल मध्ये ऑर्डर लवकर मागणे एकाच्या जिवावर बेतले आहे. लवकर नाश्ता का मागतो? हॉटेल तुझ्या बापाची आहे का? असे म्हणत हॉटेल मालक आणि वेटर यांच्या बेदम मारहाणीत ग्राहकाचा जिंतूर शहरात मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्य आरोपीसह चौघांना जिंतूर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत शेख अफसर शेख खाजा यांनी जिंतूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार,  शेख अजगर शेख खाजा हा जिंतूर येथे हॉटेल सपना या ठिकाणी आज सकाळी नऊ वाजता नाश्ता करण्यासाठी आला होता. लवकर नाष्टा देण्याची मागणी शेख अजगर याने केली. यामुळे त्याचा हॉटेल मालक आणि वेटर यांच्यासोबत वाद झाला. यातून हॉटेल मालक शेषराव लक्ष्मणराव आव्हाड, अमोल लक्ष्मणराव आव्हाड आणि वेटर बालाजी पांडुरंग रणखांबे व  इमरान बन्याभाई कुरेशी यांनी तू लवकर नाश्ता का मागतो ? तुझ्या बापाची हॉटेल आहे का? जसा आम्हाला जमेल त्यावेळेस आम्ही देऊ? असे सुनावले. मात्र, शेख अजगर आणि हॉटेल चालक, वेटर यांच्यातील वाद एवढा विकोपाला गेला. संतापलेल्या हॉटेल मालक आणि वेटर यांनी मोठ्या लाकडाने शेख अजगर यास जोरदार मारहाण केली. यात अजगर याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची वार्ता पसरताच हॉटेल समोर मोठा जमाव जमा झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तत्काळ जिंतूर गाठले. दोन्ही बाजूच्या जमावाला शांत करून सर्व आरोपींना तात्काळ अटक केली. 

या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात शेख अफसर शेख खाजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेषराव लक्ष्मणराव आव्हाड, अमोल लक्ष्मणराव आव्हाड आणि वेटर बालाजी पांडुरंग रणखांबे व  इमरान बन्याभाई कुरेशी यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील चारही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी