शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! चारठाण्यात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 18:36 IST

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजबांधवांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही.

ठळक मुद्दे१६ ऑगस्ट रोजी एका इसमावर अंत्यसंस्कार करताना बंजारा समाजबांधवांना मोठ्या हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्यादुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी पाहणी केली. तेव्हा हा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याचे आढळून आले.

चारठाणा: जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने नदीकाठी उघड्यावर अंत्यसंस्कार उरकले जात आहेत. १६ ऑगस्ट रोजी एका इसमाचे निधन झाले. मात्र या इसमावर अंत्यसंस्कार करताना बंजारा समाजबांधवांना मोठ्या हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्याचा प्रकार समोर आला.

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजबांधवांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १६ ऑगस्ट रोजी रेखा रुपचंद राठोड या साठ वर्षीय इसमाचे निधन झाले. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास या मृतदेहाला अग्नी देण्यात आला. अग्नी देताना पावसाची रिपरिप सुरु झाली. पावसाचे पाणी अग्निवर पडत असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत अग्नि देवूनही हा मृतदेह व्यवस्थित जळाला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑगस्ट रोजी घटनास्थळी जावून कुटुंबियांनी पाहणी केली. तेव्हा हा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याचे आढळून आले.

दरम्यान, या मृतदेहाला पुन्हा अग्नि देण्यात आला. विशेष म्हणजे ही अग्नी देताना २५ लिटर डिझेल, ५ लिटर पेट्रोल, चारचाकी गाडीचे दहा टायर टाकल्यानंतर हा मृतदेह पूर्णत: जळाला. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही बंजारा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नदीकाठी उघड्यावर मृतदेह जाळावा लागत आहे. पावसाळ्यात एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यास हलअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे शासनाने गंभीरतेने पाहत स्मशानभूमीला जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी समाजबांधवांकडून होत आहे.

लोकप्रतिनिधींची उदासीनताजिंतूर तालुक्यातील चारठाणा सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, राजकारणासाठी हे गाव  तालुक्याचे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे सहाजिकच या गावामध्ये लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने आहेत. या गावातील लोकप्रतिनिधींनी अनेक पदेही भूषवून जिल्ह्यात राजकारणात सक्रिय सहभाग नोंदविला. मात्र स्वातंत्र्याच्या ७४  वर्षानंतरही चारठाणा येथील बंजारा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी या लोकप्रतिनिधींना  अजूनही वेळ भेटलेला नाही. तसेच या समाजाच्या स्मशानभूमीचा मार्ग निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधीकडून शासन, प्रशासन दरबारी पाठपुरावाही करण्यात आला नाही. त्यामुळे बंजारा समाज बांधवांची अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी समाजबांधवातून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यू