‘धोकादायक पुलाला कठडे बसवा ’
सोनपेठ : तालुक्यातील अनेक नाल्यावरील पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलावर कठडे लावण्याची मागणी होत आहे. तर, काही नाल्यावरील कठडे तुटलेल्या अवस्थेत आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. मात्र या प्रश्नांकडे सा.बां. विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
नालीच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
जिंतूर: शहरातील तहसील कार्यालय तसेच नीळकंठ कॉम्प्लेक्सच्या समोरील गटारातील झालेली घाण नागरिकांची डोकेदुखी ठरत असून प्रचंड दुर्गंधी, प्लास्टिक कचरा व घाणीमुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे विविध शासकीय कार्यालये या भागात आहेत. असे असतानाही नगरपालिका प्रशासनाकडून नाल्यांची सफाई करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
कोल्हा - कोथळा रस्त्याची चाळणी
मानवत : तालुक्यातील कोल्हा ते कोथळा रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना काराव लागत आहे. या रस्त्यावर सात ते आठ गाव असून या गावातील ग्रामस्थ विविध कामासाठी मानवत शहर जवळ करतात. मात्र रस्त्यामुळे त्यांना अडचण येत आहे.
अस्तव्यस्त वाहने वाहतुकीसाठी अडथळा
पालम: शहरात बसस्थानक परिसरात राष्ट्रीय मार्गावर दोन्ही बाजूंना बेशिस्त पद्धतीने दुचाकी व तीन चाकी वाहने लावली जात आहेत. त्यामुळे बाहेर गावाहून शहरात येणाऱ्या वाहनाने वाहतुकीस अडचणी निर्माण होत आहेत. या ठिकाणी रस्ता अरूंद होत आहे.