शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

...अन् प्राण वाचविण्यासाठी काळविटाने गाठले पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 11:21 IST

कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका काळविटाने चक्क पोलीस ठाणे गाठले

ठळक मुद्देउपचार करुन सोडले जंगलातवन अधिकाऱ्यांचीही मदत

गंगाखेड (जि. परभणी) : एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळविण्यासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागते. मात्र शनिवारी   गंगाखेड शहरात कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका काळविटाने चक्क पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांनीही उपचार करुन त्याचे प्राण वाचवत त्याला संरक्षण दिले आणि जंगलात नेऊन सोडले. हा प्रकार शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गंगाखेड येथे घडला.

गंगाखेड शहर परिसरातील यज्ञभूमीच्या पाठीमागील भागातून काळविटीचा एक कळप जात होता. या कळपातून वाट चुकलेले एक काळवीट शहर परिसरात आले. एकट्या काळविटाला पाहून मोकाट कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. काळविटावर हल्लाही केला. त्यामुळे सैरभैर झालेले काळविट मिळेल त्या रस्त्याने धावत होते. याच मार्गावर असलेल्या पोलीस ठाण्यात या काळविटाने आश्रय शोधला. उपचारानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास वन अधिकारी रेखा भेंडेकर यांनी पोलीस नाईक वसंत निळे, राजकुमार बंडेवार, रमेश तिडके, ओम गादेकर, पप्पू गायकवाड यांच्या मदतीने या काळविटाला जंगल परिसरात नेऊन सोडले. 

पोलिसांनी केली कुत्र्यांच्या तावडीतून सुटकाकाळविट येताच पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेले पोलीस निरीक्षक वाय.एन. शेख, पोलीस नाईक सय्यद उमर, सुग्रीव सावंत, श्रीकांत कुलकर्णी, रतन सावंत, अनिल डोंगरे, होमगार्ड गोविंद मुंडे यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने धाव घेत कुत्र्याच्या तावडीतून काळविटाची सुटका  केली. वन अधिकारी रेखा भेंडेकर यांच्याशी संपर्क साधून जखमी काळविटाला येथील पशूवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ.श्रीनिवास कार्ले, डॉ.मिलिंद गायकवाड यांनी त्याच्यावर तातडीने उपचार केले. 

टॅग्स :forestजंगलPoliceपोलिसparabhaniपरभणी