शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

'संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा'; परभणीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 14:11 IST

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिके बाधित झाली असून, हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने मात्र काही मंडळांना मदतीपासून वगळले आहे.जिल्ह्यात चार ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

परभणी : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ३ नोव्हेंबर रोजी प्रमुख मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिके बाधित झाली असून, हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. संपूर्ण जिल्हाभरात ही परिस्थिती असताना प्रशासनाने मात्र काही मंडळांना मदतीपासून वगळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या याच प्रश्नावर शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली असून, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सकसकट मद्त द्यावी, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी जिल्ह्यात चार ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

परभणी- गंगाखेड रस्त्यावर पोखर्णी फाटा येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी रस्ता अडवून धरत जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्यात शेतकरी आर्थिक दृष्टीने खचला असताना शासन, प्रशासन मात्र लक्ष द्यायला तयार नाही. याविरुद्ध पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला. शासनाच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परभणी तालुक्यातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी माजी सभापतीे गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, हनुमान शिंदे, नरहरी शिंदे, मधुकरराव लाड, तुकाराम गिराम, राजाराम कच्छवे, भास्कर कच्छवे, मारोतराव गमे, अंगद घाटगे, श्रीकृष्ण घाटगे, रवि कांबळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे गंगाखेड रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. दोन तास आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनFarmerशेतकरी