शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

झोपेतच मृत्यूचा घाला; ट्रॅक्टर घरावर उलटल्याने उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 09:11 IST

पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील पहाटेची घटना

-विठ्ठल भिसे पाथरी - साखर कारखाण्याकडे ऊस घेऊन जाणारा भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रित व्होउन रस्त्याच्या बाजूच्या घरावर उलटल्याची घटना आज पहाटे 5 वाजता तालुक्यातील बाभळगाव येथे घडली. यात उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून घरातील 55 वर्षीय महिलेचा झोपेतच मृत्यू झाला. तर एक 8 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

बाभळगाव येथील एका शेतकऱ्याचा ऊस माजलगाव येथील खाजगी साखर कारखान्याला गळपास जात होता . आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास शेतातून उसाची ट्राली भरून एक ट्रॅक्टर बाभळगाव येथून जात होता. यावेळी ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या घरावर उलटला. 

यावेळी घरात पलंगावर झोपलेल्या पारुबाई रंगनाथ पवार (55) आणि त्यांची नात शिवानी संजय जाधव ( 8 )  या दोघी ऊसाच्या ढिगा खाली गाढल्या गेल्या. अचानक अंगावर कोसळलेल्या उसाच्या मोळ्यांने पहाटेच्या गाढ झोपेत असलेल्या आजी नातीला काहीच हालचाल करता आली नाही. 

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन घरावर पडलेल्या उसाच्या मोळ्या बाजूला काढल्या. मात्र, पारुबाई पवार यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांची नात शिवानी जाधव गंभीर जखमी आढळून आली. जखमी शिवानीला तातडीने परभणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेत घरात पलंगाच्या बाजूला झोपलेली पुष्पा पवार ही महिला सुदैवाने बचावली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू