शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

आईसमोरच मुलाचा मृत्यू; दसऱ्याचे कपडे धुण्यासाठी आईची मदत करणारा तरुण नदीत बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 19:50 IST

दसऱ्याचे कपडे धुणे जीवावर बेतले; दुधना नदीत बुडून युवकाचा मृत्यू

सेलू (परभणी) : आईसोबत दसऱ्याचे कपडे धुण्यासाठी दुधना नदी पाञात गेलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मोरेगाव येथे दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. रवि प्रकाश काकडे (२२) असे मृताचे नाव आहे.

निम्न दुधना प्रकल्पाचे दरवाजे उघडून नदीपात्रात सतत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे दुधना नदीपात्र वाहते झाले आहे. मोरेगाव येथील रवि प्रकाश काकडे (२२)  हा आईसोबत दसऱ्यानिमित्त कपडे धुण्यासाठी दुधना नदीवर आले होते. यावेळी अचानक पाय घसरून रवि नदी पात्रातील खड्ड्यात पडला. मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसताच आईने आरडाओरड केली. ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरून शोधा घेतला असता खड्ड्यातून रविला बाहेर काढण्यात आले. सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डाॅक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. मृताच्या पश्चात आई, वडील एक भाऊ असा परिवार आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यू