शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

'डर है किस बात का..' बाईकवरील रील ठरली अखेरची; चार मित्रांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 13:01 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी जाताना झाला भीषण अपघात

- विठ्ठल भिसे  पाथरी ( परभणी) : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी एकाच बाईकवर जाणाऱ्या चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दुचाकीला भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी ( दि. २६) रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या दोन विध्यार्थांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती स्थिर आहे. 

पाथरी तालुक्यातील कानसूर फाटा येथे एक खाजगी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेमध्ये डाकूपिंप्री येथील चार विद्यार्थी 9 व्या  वर्गात शिक्षण घेत होते. गुरुवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभासाठी चौघे एकाच बाईकवरून सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गावातून निघाले. शाळेपासून अगदी काही अंतरावरच दुचाकीवरील विद्यार्थी मोबाईलमध्ये व्हिडिओ रील बनवत होते. यावेळी एक व्हिडिओ  मोबाईल मध्ये कैद झाला. मात्र काही वेळातच त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. 

यात चौघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. एका विद्यार्थ्याचा अक्षरशः हात तुटून पडला होता. चौघांना तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथे आणण्यात आले. यातील स्वप्नी चव्हाण या विद्यार्थ्यास अधिक उपचारासाठी लातूरला रवाना करण्यात आले. तर इतर तिघांवर अंबाजोगाई येथे उपचार सुरू होते. दरम्यान, यातील शंतनू कांचन सोनवणे याचा गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी स्वप्निल पवार याचा आज सकाळी सहाच्या दरम्यान उपचारादरम्यान  मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

डर है किस बात का...बाईक चालवत असताना बनवलेली चौघांची रील शेवटची ठरली. यात चारही मित्र खूप उत्साही दिसत होते. रीलसाठी त्यांनी डर है किस बात का, जब हम है तेरे साथ असे गाणे वापरले होते. हा व्हिडीओ व्हायरल होत असून हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातDeathमृत्यू