शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या कारणावरून कटरने कापला मित्राचा गळा; सेलू शहरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 17:01 IST

उपचाराला नेताना जखमी मित्राचा मृत्यू

देवगावफाटा (परभणी) : दोन मित्राचा आपसात पैशाच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एकाने दुसऱ्याचा कटरने गळा चिरला. ही घटना सेलू शहरात रविवारी सकाळी १०:३० वाजता नटराज बिअर बार हॉटेल परिसरात घडली. उपचारासाठी परभणी शासकीय रुग्णालयात येत असताना त्या जखमी युवकाचा मृत्यू झाला.संतोष आवटे असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.  सेलूत दिवाळी सणाच्या दिवशी रविवारी सकाळी १०:३० वाजता नटराज बिअर बार परिसरात हेमंत गोविंद गंडले (४५, रा.शाहु नगर,सेलू  ) व संतोष किशन आवटे (३५, गोंधळी गल्ली,सेलू ) या दोन मित्रांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला. याचे रूपांतर हाणामारीत झाले. हेमंत गंडले यांनी संतोष आवटे यांचा गळा कटरने चिरला. त्यांनतर घटनास्थळी काही नागरिक धावून गेले. त्यांनी जखमी संतोष आवटे यास सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, सपोनि. संजय चव्हाण, जमादार शेख उस्मान यांनी दवाखान्यात जखमीचा जबाब घेतला. परंतू, प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार करून संतोष आवटे यास परभणी येथे शासकीय रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून सिसिटीव्ही फूटेजची तपासणी करून आरोपी हेमंत गोविंद गंडले यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस यंत्रनेकडुन पुढील कारवाई सुरु होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी