शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत राष्ट्रवादी भवन तोडफोड प्रकरणी चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 17:24 IST

परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करून शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांनी २६ आॅगस्ट रोजी खासदार पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता.

ठळक मुद्दे २६ ऑगस्ट रोजी रात्री ९.५० च्या सुमारास चौघांनी केली दगडफेकयुवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजीही केली

परभणी : येथील वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी भवन कार्यालयावर दगडफेक करून काचांची तोडफोड केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या कार्यालयासमोर सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे.

परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करून शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांनी २६ आॅगस्ट रोजी खासदार पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्पष्टीकरण देत खा.बंडू जाधव जिल्ह्यात भाजपाला पोषक वातावरण निर्माण करीत आहेत.  काही अडचणी असतील तर त्या चर्चेद्वारे आणि बसून सोडविल्या जाऊ शकतात; परंतु अशा पद्धतीने व्यक्त होणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीने दिली होती. दिवसभराच्या या घडामोडीनंतर २६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास चार युवकांनी वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी भवन कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना घडली. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी २७ ऑगस्ट रोजी सकाळी राष्ट्रवादी भवन कार्यालयास भेट दिली. त्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे.  या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ ऑगस्ट रोजी रात्री ९.५० च्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या चार जणांनी राष्ट्रवादी भवनसमोर मोटारसायकल उभ्या करुन कार्यालयाच्या दिशेने दगड फेकून मारले. त्यामुळे काचा फुटल्या. या युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजीही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर तट या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारी