शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयफोन डिलिव्हरीसाठी 'तारीख पे तारीख' देणाऱ्या फ्लिपकार्ट विरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 15:13 IST

ऑनलाइन खरेदी केलेला आयफोन महिना उलटूनही मिळालाच असल्याने अभियंत्यांची फ्लिपकार्ट विरोधात तक्रार

ठळक मुद्देऑनलाईन सेलमध्ये भरघोस सूट मिळाली पूर्ण पैसे आधीच भरूनही आयफोन मिळाला नाही

गंगाखेड (परभणी ) : फ्लिपकार्टवरून दिवाळीदरम्यान भरघोस सूट असलेला ऍपल कंपनीचा आयफोन पूर्ण पैसे भरून खरेदी केल्यानंतर महिना उलटूनही मिळाला नाही. तसेच कंपनीला सतत संपर्क करूनही 'तारीख पे तारीख' देत प्रतिसाद मिळाला नसल्याने एका अभियंत्यांने फ्लिपकार्ट विरोधात गंगाखेड पोलीस स्थानकात ८० हजार रुपयाची फसवणूक झाल्याची तक्रार दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. 

सध्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बहुतांश ग्राहक ऑनलाइन खरेदीला पसंती देत असल्याने ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या कंपन्याकडून आकर्षक ऑफर नियमितपणे ग्राहकांना दिल्या जातात. मात्र अशाच एका ऑनलाइन व्यवहारात ग्राहकाची फसवणूक झाल्याची घटना गंगाखेड शहरात उघडकीस आली आहे. येथील एमएसईमध्ये अभियंता असलेले कैलास अनिल फड यांनी दिवाळी दरम्यान दि. १५ ऑक्टोबर रोजी फ्लिपकार्टवरून बिग बिलियन डेज या ऑफरमधून १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा ऍपल आयफोन ११ प्रो हा ७९ हजार ९९९ रुपयांना खरेदी केला. आयफोन खरेदीत मोठी सूट मिळत असल्यामुळे फड यांनी नेट बँकिंगद्वारे आपल्या खात्यातून ७९ हजार ९९९ रुपये फ्लिपकार्ट कंपनीला लागलीच दिले. मात्र, तो आयफोन अद्याप त्यांना मिळालाच नाही. 

कंपनीकडून 'तारीख पे तारीख' कैलास फड यांनी दि. १५ ऑक्टोबर ते दि. २२ नोव्हेंबर दरम्यान फ्लिपकार्ट कंपनीकडे याबद्दल वारंवार चौकशी केली. आयफोन किंवा दिलेले पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र कंपनीकडून त्यांना वेगवेगळ्या तारखा सांगून फोन मिळेल असे सांगण्यात आले. कंपनीकडून मोबाईल किंवा पैसे मिळत नसल्याने फड यांनी रविवारी गंगाखेड पोलीस ठाणे गाठले. आयफोन खरेदीसाठी फ्लिपकार्ट कंपनीसोबत केलेल्या ऑनलाइन व्यवहाराची कागदपत्रे सादर केली. दिलेल्या फिर्यादीवरून फ्लिपकार्ट कंपनी मर्चंटविरुद्ध फसवणूकीसह आयटी ऍक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर या करीत आहेत.

ऑनलाइन आमिषाला बळी पडू नकाऑनलाइन खरेदी विक्रीच्या व्यवहारात फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. ऑनलाइन व्यवहारात दिल्या जाणाऱ्या आमिषाला बळी पडू नका. महागड्या वस्तू ऑनलाइन खरेदी करतांना नागरिकांनी सजग राहत आपली फसवणूक तर होत नाही ना याची खात्री करूनच व्यवहार करावा. -  वसुंधरा बोरगावकर, पोलीस निरीक्षक 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFlipkartफ्लिपकार्टonlineऑनलाइन