सेलू शहरामध्ये अवैध धंद्यांवर छापा टाकण्यासाठी निघालेल्या पथकाला शहरातील जवळेकर चौक येथे दोन इसम देशी दारूचे बॉक्स दुचाकीवर घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून या पथकाने शहरातील जवळेकर चौकात दुचाकी क्रमांक एमएच २२-एटी-१९३९ ला थांबविले. त्यानंतर त्यांची झडती घेतल्यानंतर आरोपी चंद्रकांत रघुनाथ मुजमुले (२५), किशोर रुखमाजी आवचार (३९, दोघे रा. मौलाना आझाद नगर, सेलू) यांच्या ताब्यातील ४८ दारूच्या बाटल्यांचा एक बॉक्स ज्याची किंमत ७ हजार २०० रुपये तसेच विदेशी दारूच्या ४८ बाटल्यांचा एक बॉक्स ज्याची किंमत ६ हजार ७२० रुपयी दारू पकडली. तसेच दुसऱ्या दुचाकी क्रमांक एमएच २२ -एयू ३९३५ या दुचाकीवर विदेशी दारूचा बॉक्स ज्याची किंमत ६ हजार ७२० रुपये व दोन दुचाकी असा एकूण १ लाख ६० हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.
अवैध दारू विक्रीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST