शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

CoronaVirus : आम्ही एक वेळ जेवण करु; पण जनावरांचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 6:50 PM

या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणा-यांचे हाल होत आहेत. 

ठळक मुद्देसंचारबंदीचा परिणाममुक्या जनावरांचे होताहेत हाल

परभणी : कोरोना या आजाराची लागण होऊ नये म्हणून शासनाने २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ सुरु केले आहे. या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणा-यांचे हाल होत आहेत. 

नवीन मोंढा येथे जवळपास २५ बैलगाडी चालक असून बैलगाडी हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे; परंतु, गेल्या १३ दिवसांपासून लॉकडाऊन सुरु असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या आयुष्यात अशी वेळ कधीच आलीच नव्हती ती लॉकडाऊनने आमच्यावर आणली आहे. आम्ही एकवेळ जेवण करुन राहू शकतो; परंतु, आमचा ज्यावर उदरनिर्वाह चालतो त्या मुक्या जनावरांचे काय, असा प्रश्न शेख महेमूद शेख मस्तान, शेख मोहसीन शेख यासीन, शेख तुराब शेख रियाज, शेख अन्वर शेख हबीब, शेख हसन शेख पाशा या बैलगाडी चालकांनी केला.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून वैरणीचे दरही वाढले आहेत. २० रुपयाला मिळणारी पेंढी आता २५ रुपयाला मिळत आहे. हिवाळा व पावसळा हिरवा चारा बैलांना मिळू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात हिरवा चाराही मिळणे शक्य होत नाही. घरी बसावे तर लेकराबाळांना काय खाऊ घालावे आणि बाहेर निघावे तर लॉकडाऊन, या परिस्थितीमुळे आमची स्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ या म्हणीप्रमाणे झाली आहे, असे ते म्हणाले.

‘कामाला येतो; पण आंतराने बसतो’कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून आम्ही शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करीत आहोत. हाताला काम मिळावे, म्हणून आजही आम्ही लॉकडाऊन असले तरी मोंढ्यात येवून बसत आहोत. बैलगाडी सावलीच्या ठिकाणी बांधून बैलांना वरण टाकून आंतराअंतराने बसतो. यापूर्वी  दिवसाकाठी हजार-बाराशे रुपये मिळायचे; परंतु, कोरोना या आजारामुळे दोनशे रुपये मिळणेही मुश्कील झाले आहे. कधी-कधी तर पेंढीचे दुकान बंद असल्यामुळे बैलांना वैरणही टाकू शकत नाही, याची मनाला खंत वाटते, असे बैलगाडी चालक म्हणले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी