शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

CoronaVirus : धक्कादायक ! चार दिवसांपासून पाथरीत अडकलेल्या चंद्रपूरच्या ७० मजुरांची अद्याप आरोग्य तपासणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:53 IST

फलटण येथील काखान्याला होते कामाला 

ठळक मुद्देप्रशासनास नव्हती माहितीअन्नसाठा संपल्याने मजूर अडचणीत

पाथरी : तालुक्यातील लोणी बु येथील ऊस तोडणी  मुकादमाने चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील 70  ऊसतोड मजूर  फलटण येथील साखर कारखान्याला कामाला नेले होते कारखाने बंद झाल्यानंतर फलटण येथून हे सर्व मजूर चार  दिवसापूर्वी  26 मार्च रोजी पाथरी तालुक्यातील लोणी बु येथील तांड्यावर येऊन दाखल झाले आहेत मात्र पुढे जाण्यासाठी आता रस्ते बंद असल्याने ते सर्व लोणी येथे अडकून पडले आहेत. या बाबत तहसीलदार यांच्याकडे लेखी माहिती देण्यात आली नव्हती असे कळत असून त्यांची आरोग्य तपासणी ही झाली नसल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे.

पाथरी तालुक्यातील लोणी बु येथील शामराव पवार हे ऊस तोडणी मुकादम आहेत , कर्नाटक राज्यातील एका कारखाण्यासोबत त्यांनी या वर्षी करार केला होता , चार टोळ्यातुन जवळपास 100 मजूर ऊसतोडणी साठी नेण्यात आले होते त्यातील 70 मजूर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील आहेत. कर्नाटकच्या कारखान्याचे गाळप  बंद झाल्यानंतर  हे मजूर दोन महिन्यांपूर्वी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील कापशी शरयू ऍग्रो  इंडस्ट्री या साखर कारखान्यावर कामाला होते. 

24 मार्च रोजी सर्व मजूर फलटण येथून ट्रॅक्टर ने थेट परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील लोणी बु येथील तांड्यावर म्हणजेच मुकडमाच्या गावी आले आहेत ,  गेल्या चार दिवसा पासून  हे मजूर लोणी तांड्यावर आहेत आज त्यांच्याकडे असलेले सर्व रेशन संपले आहे ,त्याना पुढे जाता येईना आणि थांबता येईना अशी अवस्था झाली आहे. या मुळे  मजूर चांगलेच अडचणीत सापडले आहेत ,  मजुरांची वैधकीय तपासणी झाली की नाही या बाबत प्रशासन नाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती , विशेष म्हणजे आलेले मजूर गावात चक्क कापूस वेचून मजुरी करत आहेत.

स्थलांतर परवानगी देता येणार नाहीपाथरी तालुक्यातील लोणी बु येथे काही ऊस तोड मजूर आले असल्याची माहिती मोबाईल वर मिळाली आहे. मात्र संचारबंदी मुळे जिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत त्या मुळे कोणालाही स्थलांतर परवानगी देता येणार नाही. अडकलेल्या मजुरांची मुकादमाने सोय करावी -एन यु कागणे, तहसीलदार,पाथरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी