शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

CoronaVirus : परभणीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 19:42 IST

अनावश्यक बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई

ठळक मुद्देपोलिसांचा कडक पवित्राकारवाई तीव्र होणार

परभणी :  संचारबंदीचे उल्लंघन करून रस्त्यांवर येऊ नका, असे वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने आता पोलिसांनी कडक पवित्रा घेतला असून, परभणीतील ६ तर ताडकळसमधील ४ अशा एकूण १० जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ 

जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ संचारबंदी दरम्यान नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी ७ ते ११ चा वेळ देण्यात आला आहे़ असे असतानाही अनेक नागरिक अनावश्यकपणे रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत़ प्रारंभी पोलिसांनी गुन्हे दाखल न करता या नागरिकांना लाठ्यांचा प्रसाद दिला़ त्यामुळे रस्त्यावर फिरणाºया रिकाम टेकड्यांची गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा होती; परंतु, पोलीस पुढे निघून गेले की, पुन्हा रस्त्यावर येणाºयांची संख्या कायम राहू लागली़ त्यामुळे आता पोलिसांनी अशांना लाठ्यांचा प्रसाद देण्याऐवजी  थेट त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे़ या अंतर्गत परभणी शहरात ३० मार्च रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यांतर्गत विनोद मधुकर कांबळे (वैभवनगर), संकेत सुधाकर माळी (रामकृष्णनगर), विकास ढोके (साईबाबानगर), आॅटो चालक शेख अजहर शेख बशीर (वांगी रोड), मोटारसायकल चालक राजहंस बन्सी भोसले (जुना पेडगाव रोड), आॅटो चालक मुंजाजी तुळशीराम पाचंगे (रमाबाई नगर) या सहा जणांविरुद्ध संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी तसेच तोंडाला रुमाल न बांधता फिरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या शिवाय ताडकळस येथे आकाश तुकाराम फुलवरे, गणेश तुकाराम फुलवरे, लक्ष्मण मुरलीधर आवरगंड, दिगंबर प्रभाकर आवरंगड हे चार जण ३०  मार्च रोजी सायंकाळी ६़४५ च्या सुमारास गावात संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करून व तोंडाला मास्क न लावता तसेच सोशल डिस्टन्स न ठेवता सहज साथ रोगाचा प्रादुर्भाव होवू शकेल, अशा स्थितीत आढळून आले़ त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलीस हवालदार गणेश उत्तमराव चनखोरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी