शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Corona Vaccine: राज्यातील सव्वा कोटी लाभार्थ्यांचा कोविशिल्डचा दुसरा डोस बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 14:50 IST

राज्याने नोंदविली केंद्र सरकारकडे लसीची मागणी

- राजन मंगरुळकरपरभणी : राज्यात नवीन कोविड आजाराच्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने दैनंदिन लसीकरणामध्ये वाढ होत आहे. कोविशिल्डची सध्या मागणी आहे. मात्र, लसीचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे लसीची मागणी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने केंद्र शासनाकडे केली आहे. राज्यात कोविशिल्डचा दुसरा डोस राहिलेल्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल १ कोटी ३१ लाख आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात कोरोना नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने आरोग्य विभाग सतर्क आहे. त्यादृष्टीने दैनंदिन लसीकरणात वाढ होत असून दुसऱ्या, तिसऱ्या लाटेमध्ये लसीकरण सुरू झाल्यावर अनेकांनी कोविशिल्ड लस घेण्यास प्राधान्य दिले. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी होता. मात्र, डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाचे रुग्ण राज्यात कमी प्रमाणात आढळत होते. त्यामुळे लसीकरणाच्या टक्केवारीवरही परिणाम झाला. पहिल्या डोसचे लसीकरण सर्वच जिल्ह्यांमध्ये ७० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान झाले. मात्र, दुसऱ्या डोसचे लसीकरण अनेकांचे शिल्लक राहिले. आता पुन्हा नव्याने चौथी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागाने लसीकरणावर भर दिला, तसेच नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती झाल्याने अनेकांनी लसीकरण केंद्राकडे पावले वळविली. सद्य:स्थितीत राज्यात कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध नसल्याने केवळ कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांचेच लसीकरण सुरू आहे. त्यादृष्टीने राज्याच्या आरोग्य विभागाने केंद्र शासनाकडे कोविशिल्ड लसीची मागणी नोंदविली आहे. ही लस पुढील आठवड्यापर्यंत राज्यात येण्याची शक्यता असल्याचेही समजते.

१ कोटी ३१ लाख लाभार्थी दुसऱ्या डोसपासून दूरराज्यात सध्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस राहिलेल्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटी ३१ लाख एवढी आहे. तसेच १८ ते ५९ वयोगटातील बूस्टर डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची टक्केवारी ११ टक्के आहे. यावरून मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचे लसीकरण राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या कोव्हॅक्सिन लसीचे लसीकरण पूर्ण केले जात आहे.

लसीकरण सत्राचे करा नियोजनकोविशिल्ड लसीचा साठा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत कमीत कमी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी लसीकरण सत्राचे नियोजन पूर्ण करावे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडे याद्यानुसार संबंधित लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना लसीकरण सत्राच्या नियोजनाची माहिती द्यावी व जिल्हा, महापालिका स्तरावरून लस वाटपाचे नियोजन करावे, अशा सूचना अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा यांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

५ कोटी ४३ लाख लाभार्थ्यांचा प्रिकॉशन डोस बाकीराज्यात एकूण ५ कोटी ४३ लाख ६४ हजार ५९३ लाभार्थ्यांचा कोविशिल्ड लसीचा प्रिकाॅशन डोस बाकी आहे. त्यामुळे राज्यातील बूस्टर डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची सध्याची टक्केवारी ही केवळ ११ टक्के एवढी आहे.

६ कोटी ७४ लाख डोसची गरजकोविशिल्ड लसीचा दुसरा डोस तसेच प्रिकॉशन डोस मिळून राज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये ६ कोटी ७४ लाख ८२ हजार १०९ लाभार्थ्यांना कोविशिल्ड डोसची गरज आहे. त्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.

जिल्हा            दुसरा डोस शिल्लक लाभार्थीअहमदनगर             ६,०५,९९४अकोला             २,८०,२३५अमरावती             ४,४६,२७९औरंगाबाद             ५,५९,३४२बीड                         ३,१७,८६४भंडारा                         ४७,८६७बुलढाणा             ३,४६,८७७चंद्रपूर                         १,९८,१६९धुळे                         २,०४,७१३गडचिरोली             १,२५,६२१गोंदिया                         ८८,९०२हिंगोली                         ५८,२५०जळगाव             ४,७६,२३५जालना                         १,२९,६२२कोल्हापूर             ५,९६,०१८लातूर                         २,६६,०४३मुंबई                         ८,७८,६५५नागपूर                         ८,१८,५८१नांदेड                         ४,१३,७५५नंदूरबार             २,६९,८६६नाशिक                        ५,३१,३९८उस्मानाबाद             २,२६,६८७पालघर                        ३,९२,६७७परभणी                        २,१२,२८५पुणे                         १२,७१,८३८रायगड                         २,९९,५४२रत्नागिरी                         १,२१,९१०सांगली                         २,७२,७४४सातारा                         ३,३४,४४२सिंधुदुर्ग                         ६८,५७६सोलापूर                         ७,६९,७०७ठाणे                         ९,०८,६८५वर्धा                                    १,६९,३९३वाशिम                         १,००,७५६यवतमाळ                         ३,०७,९८८एकूण                         १,३१,१७,५१६

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणीAurangabadऔरंगाबाद