शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अर्थकारण बदलले; हाताला काम नसल्यामुळे श्रमिकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 17:57 IST

मोर्चा, दिंडी, शालेय उपक्रमांचा शनिवार बाजार हा साक्षीदार असला तरी श्रमिकही याच ठिकाणावरुन आपल्या कामाला सुरुवात करतात.

ठळक मुद्देकाम न मिळाल्यास रिकाम्या हाताने परतावे लागते घरी 

परभणी : शहरातील शनिवार बाजारात आठवड्याला पालेभाज्यांचा बाजार भरत असला तरी दररोज सकाळी सहा ते अकरा या वेळेत येथे श्रमीक (मजूर) कामाच्या अपेक्षेने हजेरी लावतात. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यांपासून त्यांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली ंआहे.

मोर्चा, दिंडी, शालेय उपक्रमांचा शनिवार बाजार हा साक्षीदार असला तरी श्रमिकही याच ठिकाणावरुन आपल्या कामाला सुरुवात करतात. मागील तीस वर्षापासून दररोज सकाळी सहा ते अकरा या वेळेत दोनशे ते तीनशेमजूर  या ठिकाणी उभे राहून मिळेल ते काम उपलब्ध होईल का याची प्रतिक्षा करोत असतात. या श्रमिकांमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. कुदळ, फावडे, खुरपे, टोपले, पहार आदी साहित्य त्य्प्या समोबत असते. मागील पाच महिन्यांपासून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडल्याने या श्रमिकांच्या हाताला काम मिळेना झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एखादा अनोळखी व्यक्ती सकाळच्या वेळी बाजारात आला की, त्याच्या भोवती श्रमीक गोळा होतात. काय काम आहे?, कुठे जायचे, कोणते काम करायचे? असा प्रश्नांचा भडीमार करतात. यावर काम मिळाले आनंदी होतात नाही तर निराश होऊन जागेवर जावून उभे राहतात. हे चित्र नित्याचे झाले आहे.

‘जिल्हा प्रशासनाने कामे उपलब्ध करुन करावीत’मागील पाच महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे या श्रमिकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोनशे ते तीनशे हातात मिळणारी रोजंदारी ती पण कोरोना आजारामुळे मिळत नाहीत. जिल्हा प्रशासनाने श्रमिकांना काम उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी शेख मुन्ना, सय्यद इरफान, शेख इस्माईल, शेख इरफान, अशोक गुंजकर, विशाल कांबळे, सय्यद जावेद, अमीर खान यांनी केली आहे.

आजवर अशी वेळ कधी आली नव्हती शनिवार बाजाराच्या ठिकाणाहून हमखास काम मिळते म्हणून भल्या पहाटे उठून सकाळी सहा वाजता येथे अनेक जण येतात. सकाळी अकरा पर्यंत ठिकाणी ते थांबतात. काम मिळाले तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो नाही तर निराश होऊन सोबत आणलेले साहित्य परत डोक्यावर घेऊन घरी परतात. आजवर उपाशी राहण्याची वेळ कधी आली नव्हती, ती आज कोरोनाच्या संसर्गामुळे आमच्यावर आली आहे.- सय्यद जावेद, श्रमिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणीCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक