शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

परभणी जिल्ह्यात दोन कोटींतून होणार पाणीटंचाई निवारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:33 IST

जिल्ह्यात यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने २९ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़

परभणी : जिल्ह्यात यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़ या कामांमधून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे़ 

मागील वर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाईची समस्या तीव्र नसली तरी ग्रामीण भागात अनेक गावांना टंचाई जाणवू लागली आहे़ पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यातच पुढील सहा महिन्यांच्या पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार केला होता़ तब्बल २९ कोटी ४३ लाख ६४ हजार रुपयांचा हा आराखडा तयार करून टंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये या आराखड्यानुसार उपाययोजना करण्याचे निश्चित केले होते़ आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून या प्रत्येक तीन महिन्यांच्या टप्प्यांमध्ये कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात आली़ सध्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत करावयाच्या कामांचा आढावा घेतला जात आहे़ 

जिल्ह्यात पाणीटंचाईने ग्रासलेल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे २ कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात केली आहे़ यात टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना आणि नवीन विहीर, बोअर घेण्याची कामे केली जात आहेत़ जिल्हाभरात विंधन विहिरींच्या दुरुस्तीवर ५१ लाख ५१ हजारांचा खर्च केला जात असून, नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीवर ६६ लाख ८ हजार रुपये खर्च केला जात आहे़ त्याचप्रमाणे १६ लाख ९९ हजार रुपयांच्या खर्चातून तात्पुरती पूरक नळ योजना घेतली जात आहे़ ग्रामीण भागामध्ये ही कामे सुरू झाली आहेत़ मे महिना जिल्ह्यासाठी टंचाईचाच ठरत आहे़ या महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढत चालली आहे़ अजूनही उन्हाची तीव्रता कमी झाली नसल्याने पाणी पातळी खालावत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे़ 

१२८ विंधन विहिरींना मंजुरीपरभणी जिल्ह्यात या उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाणी पातळी खोल गेली आहे़ त्यामुळे संबंधित गावांत पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन विंधन विहीर खोदकामांसाठी मंजुरी दिली आहे़ आतापर्यंत १२८ विंधन विहिरींच्या खोदकामांना मंजुरी देण्यात आली असून, या विहिरी घेतल्यानंतर त्या त्या गावांमधील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे़ सध्या विंधन विहीर घेण्याची कामे सुरू आहेत.

विंधन विहीर दुरुस्तीची कामे सुरू

जिल्ह्यात २२४ ठिकाणी विंधन विहिरींची दुरुस्ती केली जात आहे़ त्यात पूर्णा आणि गंगाखेड येथे प्रत्येकी ५१ ठिकाणी विंधन विहिरी दुरुस्त करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यावर पूर्णा तालुक्यात १० लाख ३४ हजार तर गंगाखेड तालुक्यात १० लाख १४ हजारांचा खर्च होत आहे़ सेलू व जिंतूर तालुक्यामध्ये प्रत्येकी ३८ गावांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती होत असून, सेलू तालुक्यात १२ लाख ३२ हजार तर जिंतूर तालुक्यात ९ लाख ४५ हजारांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ मानवत तालुक्यात १०, पाथरी ६, सोनपेठ ९ आणि परभणी तालुक्यात एका ठिकाणी विंधन विहिरीची दुरुस्ती केली जात आहे़ 

जिंतूर तालुक्यात सर्वाधिक कामेपाणीटंचाईच्या झळा संपूर्ण जिल्ह्यात बसत असल्या तरी जिंतूर, गंगाखेड, पालम या तालुक्यांमध्ये  तीव्रता अधिक आहे़ जिल्हा प्रशासनाने जिंतूर तालुक्यात एकूण ९० कामे सुरू केली असून, ४८ लाख ५० हजार रुपये खर्च करून टंचाईवर मात केली जात आहे़ गंगाखेड तालुक्यामध्ये टंचाई निवारणाची १०३ कामे सुरू असून, त्यावर २६ लाख २५ हजार रुपये खर्च होत आहेत़ तर पूर्णा तालुक्यात १९ लाख २० हजार रुपये खर्चाची ७८ कामे, सेलू तालुक्यात १८ लाख ९४ हजार रुपये खर्चातून ४४ कामे सुरू आहेत़ पालम तालुक्यात १३ लाख ४ हजार रुपये खर्च करून ५१ कामे सुरू आहेत़ परभणी तालुक्यात ३ लाख ४५ हजार, सोनपेठ तालुक्यात २ लाख ५२ हजार, पाथरी तालुक्यात ८ लाख ७४ हजार आणि मानवत तालुक्यात १ लाख ९८ हजारांची कामे सुरू आहेत़ 

२९ कोटी ४३ लाखांचा आराखडापाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने २९ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़ त्यात ग्रामीण भागात ५१४ कामे करण्याचे नियोजन करण्यात आले होते़ जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ९ कोटी २४ लाख २० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़ पालम तालुक्यात ४ कोटी १४ लाख, पूर्णा तालुक्यात ५ कोटी १९ लाख तर पाथरी तालुक्यात २ कोटी १२ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला होता़ या आराखड्यानुसार कामे घेतली जात आहेत़ 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईState Governmentराज्य सरकारParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीfundsनिधी