शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

देशात सध्या दहशत व भीतीचे वातावरण असून संवैधानिक मूल्यांची हत्या होत आहे : कन्हैय्याकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:27 IST

देशात सद्यस्थितीत दहशत व भितीचे वातावरण असून संवैधानिक मूल्यांची हत्या केली जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने केला.

ठळक मुद्देबॅलेट पेपर, व्हीव्हीपॅडचा वापर वाढविण्याची गरजदाभोलकर- पानसरे हत्या प्रकरणात संभ्रमित करण्याचा प्रयत्न

परभणी : देशात सद्यस्थितीत दहशत व भितीचे वातावरण असून संवैधानिक मूल्यांची हत्या केली जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने आज पत्रकार परिषदेत बोलताना केला.

'संविधान बचाव, देश बचाव' अभियानांतर्गत आयोजित जाहीर सभेसाठी कन्हैय्याकुमार आज परभणीत आला आहे. यावेळी त्याने शहरातील बी. रघुनाथ सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, युवक काँग्रेसचे नागसेन भेरजे, कॉ. राजन क्षीरसागर, भगवान वाघमारे, रवि सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, ९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे जंतर-मंतरवर भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या गेल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या, ही भारतीय लोकशाहीवर हल्ला करणारी घटना आहे. सद्यस्थितीत देशात भय व दहशतीचे वातावरण आहे. संवैधानिक मूल्यांची हत्या केली जात आहे. भारतीय लोकशाही कमजोर करुन भीडतंत्राला मजबूत करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींकडून केला जात आहे; परंतु, असत्य हे जास्त दिवस टिकत नसते. एक- ना एक दिवस सत्याचाच विजय होत असतो, असेही कन्हैय्याकुमार म्हणाला. 

सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारावेगेल्या चार वर्षापूर्वी केंद्रातील सरकारने सत्तेवर येताना जनतेला जी आश्वासने दिली होती, त्याचे काय झाले? या बाबतचा प्रश्न  सत्ताधाऱ्यांना विचारण्याची गरज आहे. संविधान बचाव, देश बचाव हे अभियान कोण्या पक्षाच्या, कोण्या सरकारच्या विरोधातला कार्यक्रम नाही किंवा कोणाला पंतप्रधान पदावरुन खाली खेचण्याचा किंवा कोणाला पंतप्रधान पदावर बसविण्याचा कार्यक्रम नाही तर संवैधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी घेतलेला पुढाकार आहे. आम्हाला भारतीय लोकशाही मजबूत करणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा देश बनवायचा आहे तर त्यांना सावरकरांच्या विचारांचा देश बनवायचा आहे. 

बॅलेट पेपर, व्हीव्हीपॅडचा वापर वाढविण्याची गरजविविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रियेस आक्षेप घेतला जात आहे. या संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, ईव्हीएमला सर्वप्रथम लालकृष्ण आडवाणी यांनी विरोध केला होता. शिवाय जगातील बहुतांश विकसित देश आता बॅलेटपेपरनेच निवडणुका घेण्याच्या तयारीत आहेत. मी आयटी इंजिनिअर नाही किंवा संगणक तज्ज्ञ नाही; परंतु, बहुतांश पक्ष संघटना बॅलेट पेपरची मागणी करीत आहेत. व्हीव्हीपॅडचा वापर वाढविण्याची मागणी करीत आहेत. तर त्या दृष्टीकोनातून विचार करण्यास काय हरकत आहे, शेवटी लोकशाहीत बहुमतालाच महत्व आहे.

दाभोलकर- पानसरे हत्या प्रकरणात संभ्रमित करण्याचा प्रयत्नपत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई करीत आरोपींना पकडले; परंतु, महाराष्ट्रात विचारवंत नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. आता कर्नाटकमध्ये कारवाई होत असल्याने तेथील पोलीस महाराष्ट्रात येऊन कारवाई करतील म्हणून लोकांना संभ्रमित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कारवाई सुरु झाली आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. याबाबत खोटी माहिती पसरविली जात आहे, असा आरोपही यावेळी कन्हैय्याकुमार यांनी केला. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारparabhaniपरभणीSocialसामाजिकGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार