शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेसचे मौनच आघाडीतील अडथळा : प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 18:10 IST

या प्रश्नावर कॉंग्रेस मौन बाळगून असल्याने आघाडी संदर्भात अडथळे येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी येथे स्पष्ट केले.

परभणी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा अजेंडा कॉंग्रेसने करावा, कॉंग्रेससोबत वंचित बहुजन आघाडी युती करेल, असे आम्ही यापूर्वीच सांगितले आहे. मात्र या प्रश्नावर कॉंग्रेस मौन बाळगून असल्याने आघाडी संदर्भात अडथळे येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी येथे स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथे आयोजित सत्ता संपादन महासभेसाठी प्रकाश आंबेडकर परभणीत आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संविधान बदलायला निघाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणावे ही आमची प्रथम मागणी आहे. या संदर्भात अजेंडा करण्यास कॉंग्रेस तयार होत नाही. आम्ही आतापर्यंत लोकसभेच्या १२ जागा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेस सोबत आघाडी झाली तरी या जागा वगळून इतर जागांवर चर्चा होईल.

वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ४८ मतदारसंघात तयारी केली आहे. कॉंग्रेस आणि इतर राष्ट्रीय पक्षांमध्ये यापूर्वीचे अनेक गोंधळ असल्याने हे पक्ष भाजपाच्या विरोधात लढू शकत नाहीत. त्यासाठी प्रादेशिक पक्षच लढा देऊ शकतात, असेही आंबेडकर म्हणाले. या पत्रकार परिषदेस लक्ष्मणराव माने, डॉ.वानखेडे, कॉ.गणपत भिसे, वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक डॉ.धर्मराज चव्हाण, भारिपचे जिल्हाध्यक्ष दादाराव पंडित आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसElectionनिवडणूक