याबाबत वसमत तालुक्यातील राजापूर येथील दुधाजी एकनाथ बरुडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते २ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास त्यांच्या एमएच ३८ ए ०५४३ क्रमांकाच्या दुचाकीने ताडकळस येथून गावाकडे जात होते. पूर्णा तालुक्यातील गौर गाव परिसरात चुडावाकडून एक ट्रक येत होता. यावेळी त्यांच्या पाठीमागून गौर येथील शेषेराव विश्वनाथ पारवे हे त्याच्या दुचाकीवर येत असताना बरुडे यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पारवे यांनी त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात बरुडे यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार घेतल्यानंतर दुधाजी बरुडे यांनी २४ जून रोजी चुडावा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यावरून आरोपी शेषेराव विश्वनाथ पारवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शेषेराव पारवे यांनीही चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात रस्त्याच्या बाजूला दिगांबर पारवे यांना आपण बोलत असताना पाठीमागून येऊन दुधाजी एकनाथ बरूडे यांनी त्यांच्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांनी नांदेड येथे उपचार घेतला. याबाबत त्यांनी चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दुधाजी बरूडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी अपघातप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST