शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मानधन काढण्यासाठी चार हजाराच्या कमिशनची लाच; गटविकास अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यास एसीबीची अटक

By ज्ञानेश्वर भाले | Updated: March 28, 2023 09:54 IST

मानवत पंचायत समिती कार्यालयात प्रशिक्षणार्थींना  मास्टर ट्रेनरने प्रशिक्षण दिले होते

मानवत (जि.परभणी) : प्रशिक्षणाचे मानधन काढण्यासाठी पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी  आणि विस्तार अधिकऱ्याला ४ हजार रुपयाची लाच कमिशन स्वरूपात घेतल्याप्रकारणी  लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई केली. याप्रकरणी २८ मार्चल पहाटे 2:30 वाजता  गुन्हा दाखल करून दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केली.

मानवत पंचायत समिती कार्यालयात प्रशिक्षणार्थींना  मास्टर ट्रेनर यांनी १७ ते २१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीदरम्यान राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत  ‘आमचा गाव , आमचा विकास ‘ उपक्रमांतर्गत  प्रशिक्षण दिलेले होते. तक्रारदार ट्रेनर यांचे    कामाचे मानधन१४ हजार रूपये होते. हे मानधन विस्तार अधिकारी संदीप पवार यांच्या   खाजगी बँक अकाऊंटवर जमा झाले होते. मानधन  घेण्यासाठी  तक्रारदार यांनी प्रभारी गटविकास अधिकारी स्वप्निल पवार व  पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संदीप पवार यांना वारंवार प्रत्यक्ष भेटून मागणी केली. तसेच तक्रारदार यांनी वरिष्ठांना लेखी तक्रार करून सुद्धा त्यांना मानधनाची रक्कम देण्यात आलेली नव्हती. यातील विस्तार अधिकारी संदीप पवार यांनी  ट्रेनर यान तक्रारदार ट्रेनर यांना १४ हजाराचा देय धनादेश  न देता १० हजार  रू रक्कमेचा स्वतः च्या वैयक्तिक बँक खात्याचा चेक देऊन ४,००० रू.कमिशन स्वरूपात लाचेची रक्कम स्विकारली. याप्रकरणी  अविनाश मगर यांच्या तक्रारीवरून प्रभारी गट विकास अधिकारी स्वप्निल पवार विस्तार अधिकारी संदीप पवार यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे  पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे, पोनि सदानंद वाघमारे, पोनि बसवेश्वर जकीकोरे, पोह चंद्रशेखर निलपत्रेवार, पोह मिलिंद हनुमंते, पोशि अतुल कदम, पोशि शेख मुख्तार, पोशि शेख झिब्राईल, चालक पोह जनार्धन कदम, अँटी करप्शन ब्यूरो टिम परभणी यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग