शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मुख्यमंत्री रोजगार योजनेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यातील छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सराकरने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंमलात आणली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : जिल्ह्यातील छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सराकरने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५५८ लाभार्थ्यांनी बँकांकडे प्रस्ताव दाखले केले. मात्र ५१ प्रस्तावांनाच बँकांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या योजनेला बँकांकडून जिल्ह्यात खो दिला जात आहे.

अनेकांना कोणता न कोणता उद्योग, व्यवसाय सुरु करण्याची आवड असते; परंतु, नवीन उद्योग सुरु करण्यासाठी लाभार्थ्याला अडचणींचा सामना करावा लागतो. बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत १८ते ४५ वयोगटातील लाभार्थी लाभ घेऊ शकतात. यामध्ये इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, सायकल दुरुस्तीची दुकाने, काटेरी तारांचे उत्पादन, इमिटेशन ज्वेलरी उत्पादन, वर्कशॉप, स्टोरेज बॅटरी उत्पादन आदी व्यवसायांची निर्मिती करु शकतात. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील ५५८ लाभार्थ्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून या योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल केले होते. हे प्रस्ताव मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रशासनाने बँकांकडे सादर केले. विशेष म्हणजे या प्रस्तावांना वेळेत मंजुरी मिळवून बँकांकडून लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज पुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र जिल्ह्यातील बँकांनी वेगवेगळे कारणे देत २६३ प्रस्ताव रद्द केले आहेत. उर्वरित २९५ प्रस्तावांना मंजुरी देणे अपेक्षित होते; मात्र त्यातील केवळ ५१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. उर्वरित प्रस्ताव अद्यापही बँकांकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यातील सुशिक्षित, अर्धशिक्षित युवक व युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हा कार्यक्रम सुरु केला. मात्र बँकांकडून मुख्यमंत्री रोजगार योजनेला जिल्ह्यात खो दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार योजनेला बँकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या योजनेचा आढावा घेऊन प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी बँकांना आदेशित करुन उद्योज निर्मितीला जिल्ह्यात प्रोत्साहन द्यावेत, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.

प्रस्ताव रद्द करताना दिली जातात कारणे

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षामध्ये ५५८ लाभार्थ्यांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामध्ये बँकांनी कार्यक्षेत्रात प्रस्ताव बसत नाहीत, उद्योजकाला लाभार्थ्याला पुरेसे ज्ञान नाही, लाभार्थ्याने उद्योग निर्मितीसाठी दिलेला पत्ता बरोबर नाही. लाभार्थी प्रकल्प चालविण्यासाठी सक्षम नाही, यासह विविध कारणे बँकांकडून दिली जातात. ५५८ पैकी तब्बल २६३ प्रस्ताव जिल्ह्यातील विविध बँकांनी रद्द केले आहेत.