शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत अपहरणाच्या संशयावरून नागरिकांनी मनोरुग्णास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 16:21 IST

मुलांच्या अपहरणाच्या उद्देशानेच वसाहतीत आल्याचा संशय घेऊन नागरिकांनी एकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

परभणी- मुलांच्या अपहरणाच्या उद्देशानेच वसाहतीत आल्याचा संशय घेऊन नागरिकांनी एकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र पोलीस तपासात हि व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. हि घटना आज सकाळी ११.३० वाजता साईबाबानगर भागात घडली.

शहरात मुले पकडणारी टोळी आली असल्याची अफवा पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अफवा पसरत आहे. त्यामुळे नागरिक अधिकच संवेदनशील झाले असून शाळा, वसाहतींमधील मोकळ्या मैदानात अनोळखी व्यक्ती दिसल्यानंतर संशय बळावत आहे. आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एक व्यक्ती साईबाबानगर भागात आला. या ठिकाणी खेळणाऱ्या मुलांकडे तो टक लावून पाहत होता. त्यामुळे या व्यक्तीविषयी नागरिकांना संशय आला. लगेच नागरिकांनी त्याला ताब्यात घेतले आणि नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पोलिसांनी चौकशी केली तेव्हा हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मनोरुग्ण मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील बापु राऊत हा आहे. तो आज सकाळी केकरजवळा येथून वांगी येथे मावशीला भेटण्यासाठी पायी निघाला होता. वाटेत साईबाबानगर येथे तो थांबला. त्या ठिकाणी खेळणाऱ्या मुलांकडे तो पाहत असतानाच नागरिकांनी त्याला पकडले. पोलीस निरीक्षक नरसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांनी बाबू राऊत याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्याने आपले गाव व नातेवाईकांची माहिती दिली. त्यावरुन  पोलिसांनी राऊत याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पंचासमक्ष त्यास नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :PoliceपोलिसparabhaniपरभणीCrimeगुन्हा