शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सीआयडीकडून परभणी पोलिसांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:58 IST

सीआयडी पथकाकडून नानलपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणात पोलिसांचे जवाब तसेच चौकशी करण्यात आली.

परभणी : शहरात संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेनंतर अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षकांकडून परभणीतील पोलिसांची चौकशी बुधवारी करण्यात आली.

गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे परभणीमध्ये नानलपेठ पोलिस ठाणे येथे बुधवारी दाखल झाले होते. सीआयडी पथकाकडून नानलपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणात पोलिसांचे जवाब तसेच चौकशी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज्य मानवाधिकार आयोगाकडे या प्रकरणात सुनावणी झाली होती. तसेच यापूर्वी न्यायमूर्ती आचलिया यांनी सुद्धा परभणीत भेट देऊन पाहणी केली होती. आता त्यानंतर सीआयडी पथकाकडून ही चौकशी प्राथमिक स्तरावर सुरू आहे. यामध्ये पुढे घटनाक्रम तसेच अन्य काही बाबींची चौकशी सुद्धा होणार असल्याचे समजते. त्यामुळे आता विविध चौकशी समिती, अहवाल, पथकांच्या भेटी, यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूर्यवंशी प्रकरणाने पोलिस दल हादरलेशहरात संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणानंतर दंगल उसळली. या दंगलीदरम्यान तोडफोडही झाली. यात अनेकांना अटक झाली होती. यातीलच एक असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा तुरुंगात असताना मृत्यू झाल्याने पुन्हा प्रकरण पेटले. आता याचा न्यायदंडाधिकारी चौकशी अहवाल सादर झाला अन् पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले. ७९ पोलिसांना नोटिसा देणार असल्याचे ऐकायला मिळत असल्याने पोलिस दलही हादरले आहे.

राज्य मानव अधिकार आयोगासमोर अहवाल१५ डिसेंबर २०२४ रोजी पोलिस कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने छत्रपती संभाजीनगर येथे शवविच्छेदन झाले. त्याचा प्राथमिक अहवाल व्हायरल झाला. मारहाणीत धक्का बसल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले होते. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी झाली होती. शिवाय हा प्रश्न विधिमंडळात गाजल्यानंतर यात आचलिया समिती नेमली होती. या समितीनेही नुकतीच परभणीत येऊन चौकशी केली होती. पोलिस, घटनास्थळ व मयत सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची आचलिया यांनी भेट घेतली होती. तर त्यापूर्वी अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष व सदस्यांनी भेट दिली होती. त्यामुळे हे प्रकरण सातत्याने चर्चेत होते. मात्र यात कारवाई होत नसल्याचा आरोपच विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी केला होता. मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनेही या प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सातत्याने लावून धरली. शासनाची मदतही नाकारली. विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ यांना श्वसनाचा आजार असल्याचे म्हटले होते. त्यावरूनही हे कुटुंब नाराज होते. राज्य मानव अधिकार आयोगासमोर तब्बल ४५१ पानांचा न्यायदंडाधिकारीय अहवाल सादर केला आहे. यात सुनावणीही झाली. सूर्यवंशी कुटुंबीयांनीही येथे हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची व यात त्यांना मारहाण झाल्याचे म्हटले असल्याचे सांगितले जात आहे. हा अहवाल बाहेर आला नसला तरीही यामुळे पोलिस दलातील वातावरण तंगले आहे.

पोलिसांना शिक्षा व्हावी, सोमनाथच्या आईची मागणीमाझ्या मुलाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असून पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयताची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी केली आहे. तर आयोगासमोरही त्यांनी आपली अशीच बाजू मांडली आहे. तर या पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली, असे त्या अजूनही सांगत आहेत.

महिनाभर आंदोलन अन् पुन्हा लाँगमार्चपरभणी येथील उपोषण मैदानावर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी जवळपास दीड महिना आंदोलन केले. सातत्याने पोलिसांवर कारवाईची मागणी लावून धरली. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित विविध मागण्या घेऊन परभणी ते मुंबई लाँगमार्च काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी पाचारण करून त्यातील काही मागण्या मान्य केल्या होत्या. शिवाय काँग्रेसच्या वतीनेही आझाद मैदानावर आक्राेश मोर्चा काढण्यात आला होता.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी