शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिखट मिरचीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा; दीड एकरात लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 14:39 IST

वेगळा प्रयोग करत शेतकऱ्याने कमी जागेत, कमी गुंतवणीत चांगले उत्पादन घेतले

- विठ्ठल भिसेपाथरी (परभणी) : तरुण शेतकरी आता शेतीमध्ये बदल करू लागले आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक प्रयोगाची कास धरून अनेक शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. असाच वेगळा प्रयोग करत तालुक्यातील वाघाळा येथील तरुण शेतकऱ्याने सहा महिन्यातच मिरची पिकाने लखपती बनवलं. तिखट मिरचीने या शेतकऱ्याच्या आयुष्यात चांगलाच गोडवा निर्माण केल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. 

पाथरी तालुक्यातील वाघाळा गावातील 28 वर्षीय शेतकरी ऋषिकेश घुंबरे याचे वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले. त्यामुळे १२ वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर ऋषिकेश आईला मदत करण्यासाठी शेतीकडे वळला. अनेक वर्षांपासून १० एकर बागायती शेतीत पारंपरिक पद्धतीने उसाचे पीक घेतले जात असे. मात्र त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. 

दरम्यान, काही तरी वेगळे पिक शेतात घेण्याचा विचार ऋषिकेश करत होता. काही प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला घेत त्याने २५ डिसेंबर 2022 रोजी दीड एकर शेतात शार्क १ वाणाच्या मिरचीची लागवड केली. हे वाण लाल मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. लागवडीनंतर काही महिन्यांतच मिरची तोडणी सुरु झाली. आतापर्यंत ३४ क्विंटल हिरवी मिरची विक्रीतून १ लाख २ हजार रुपये तर ११ क्विंटल वाळवलेल्या लाल मिरचीला २५० रुपये प्रती किलो दर मिळून २ लाख ७५ हजार रुपये असे ३ लाख ७७ हजारांचे उत्पन्न आतापर्यंत मिळाले आहे. पावसाळा असल्याने हिरव्या मिरचीची आणखी तोडणी होणार आहे. लागवडीनंतर साधारण १५  महिने हे पिक शेतात उत्पादन देत राहते. अवघ्या दीड एकरातील तिखट मिरचीने या शेतकऱ्याच्या आयुष्यात मात्र गोडवा निर्माण केल्याने सुगीचे दिवस आले आहेत. 

अशी केली लागवड व देखरेख ...२५ डिसेंबर २०२२ रोजी शेताची पूर्व मशागत करत ४ बाय १ अंतराने मल्चींग केलेल्या बेडवर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून शार्क १ या मिरची वाणाची १५ हजार रोपे लागवड केली . यात २ हजार रोपांची तुट झाली तर त्यातील १३ हजार रोपे जीवंत राहीले .प्रारंभी बेडमध्ये  शेणखतासह सुपर फॉस्फेट १ क्विंटल , निमपेंड १ क्विंटल , पोटॅश ५० किलो , मायक्रोन्युट्रीएन्ट १५  किलो रासायनिक खत मातील मिसळून दिला . आतापर्यंत किड व बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  बुरशीनाशक व पिप्रोनील च्या ५ फवारण्या केल्या आहेत . उन्हाळ्यात गरजेनुसार पाणी दिले. मिरची तोडणी मजुरांकडून करून घेतली. तोडणीसाठी प्रती किलो दहा रुपये एवढा खर्च आला आहे .

चांगले उत्पादन मिळाल्याचे समाधान 

वडिलोपार्जित शेतीत सातत्याने उसाचे पीक घेण्यात आल्याने जमिनीचा पोत कमी होऊन उत्पादनामध्ये कमालीची घट झाली होती. यामुळे प्रयोगशील शेतकरी माझे मामा दिलीपराव साबळे यांनी मिरची लागवड करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग यशस्वी झाला. सध्या वाळलेल्या मिरचीला २७० रुपये किलोप्रमाणे मागणी आहे. आणखी काही दिवस चांगले उत्पादन मिळेल.- ऋषिकेश घुंबरे, प्रयोगशील शेतकरी, वाघाळा ता पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी