शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बालकाचा टेंपोच्या धडकेत मृत्यू; चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 17:20 IST

मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर टेंपोने धडक दिल्याने बुधवारी (दि.२) १२ वर्षाचा एक मुलगा जागीच ठार झाला होता. या बालकाच्या नातेवाईकांनी आज सकाळी मानवत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत टेंपो चालकासह मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मानवत (परभणी ) : तालुक्यातील मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर टेंपोने धडक दिल्याने बुधवारी (दि.२) १२ वर्षाचा एक मुलगा जागीच ठार झाला होता. या बालकाच्या नातेवाईकांनी आज सकाळी मानवत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत टेंपो चालकासह मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

राष्ट्रीय महामार्गावर मानवत रोड रेल्वेस्थानकाजवळ  असलेल्या रेल्वे फाटका जवळ २ मे रोजी  झालेल्या अपघातात विशाल पवार या १२ वर्षीय बालकाचा मृत्यु झाला होता. तर त्याचे वडील साईनाथ पवार हे जखमी झाले आहेत. विशाल याचा मृत्यू झाल्याने पवार कुंटुबातील संतप्त शेकडो नातेवाईकांनी आज सकाळी साडे दहा वाजता पोलीस ठाणे गाठत टेंपो चालक व मालक दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक प्रदिप पालिवाल यांनी गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्या नंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्याचा ताबा सोडला.

यावेळी भारत पवार, मुरकी पवार, रंगनाथ काळे गोरख काळे, आरुण कांबळे मचिद्र काळे, श्रावण काळे सुंदर पवार, आसाराम पवार, गणेश पवार, रावसाहेब काळे, बापु काळे, सुर्यभान पवार, राजेभाउ का ळे, धोंडीराम पवार, अशोक पवार, यांच्यासह अदी नातेवाईक उपस्थित होते.

पारधी, आदिवासी सेवा विकास परिषदेचे निवेदन मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याऱ्या टेंपो चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अदिवासी, पारधी विकास परिषदेने पोलीस निरीक्षक प्रदिप पालिवाल यांच्याकडे केली. निवेदनावर जिल्हा अध्यक्ष मधुकर काळे, ग्रामिण जिल्हा अध्यक्ष भारत पवार, उपाध्यक्ष राजाराम काळे, महासचिब शिवाजी पवार, सेलु तालुका अध्यक्ष रंगनाथ काळे, मानवत तालुका अध्यक्ष सुंदर पवार, श्रावण काळे, राम पवार यांच्या स्वाक्षरी आहेत.

 

टॅग्स :AccidentअपघातPolice Stationपोलीस ठाणेparabhaniपरभणीfour wheelerफोर व्हीलरDeathमृत्यू