शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:29 IST

विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विकासातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २७व्या दीक्षान्त समारंभात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रगतिशील शेतकरी श्रीरंग लाड यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ११ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होत आहे.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी याला मंजुरी दिली आहे. फडणवीस यांनी शेती व शेतकरी विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले व धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. स्मार्ट प्रोजेक्ट आणि पोक्रा तसेच महाराष्ट्र कृषी एआय धोरणामुळे महाराष्ट्र आज भारतातील कृषी क्षेत्रातील ‘लाइट हाऊस स्टेट’ म्हणून उदयास येत आहे. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विकासातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाच्या दृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करणार आहे.

परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथील प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड यांचीही या ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवीसाठी निवड केली आहे. राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त ‘दादा लाड कापूस तंत्रज्ञान’ हे त्यांचे सर्वांत मोठे योगदान मानले जाते. २००२-०३ पासून शेतकरी-आधारित संशोधनातून त्यांनी कापूस पिकातील उत्पादकता घटवणाऱ्या गळफांदी (मोनोपोडियल) फांद्यांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या प्रारंभिक छाटणीची प्रभावी पद्धत विकसित केली. शेंडा खुडणी, अती घन लागवड, ठिबक सिंचन आणि आच्छादन या तंत्रांचा एकत्रित अवलंब करून त्यांनी कापूस पिकासाठी समग्र, वैज्ञानिक आणि नफावर्धक तंत्रज्ञान विकसित केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त कृषी संशोधन परिषदेमध्ये प्रयोगशील आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ देण्याची सूचना केली होती. त्यानुसार ११ जणांची निवड केली.

यांना देणार शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार१. चंद्रकांत अंबादासराव देशमुख, मु. वरपूड, ता. जि. परभणी२. यज्ञेश वसंतराव कात बने, मु. धनेगाव, पोस्ट ढोरकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर३. प्रताप किशनराव काळे, मु. धानोरा (काळे), पोस्ट कळगाव, ता. पूर्णा, जि. परभणी४. श्रीकांत बेलेश्वर आखाडे, मु. वालसावंगी, ता. भोकरदन, जि. जालना५. सुदर्शन शिवाजी जाधव, मु. गंजेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव६. शरद बाबूराव पाटील, मु. मावलगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर७. भगवान रामजी इंगोले, मु. पोस्ट मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड८. अण्णासाहेब अर्जुनराव जगताप, मु. सावरगाव, ता. माजलगाव, जि. बीड९. सदाशिव वामनराव अडकिने, मु. हिंगणगाव, ता. वसमत, जि. हिंगोली

महिला शेतकरी गट१. मीरा जनार्धन आवरगंड, मु. माखणी, ता. पूर्णा, जिल्हा परभणी२. सुनंदा शिवाजी क्षीरसागर, मु. पांगरा, पोस्ट चितेगाव, ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.

English
हिंदी सारांश
Web Title : Devendra Fadnavis to Receive Honorary Doctorate from Agricultural University

Web Summary : Devendra Fadnavis and farmer Shrirang Lad will receive honorary Doctor of Science degrees from Vasantrao Naik Marathwada Agricultural University. Fadnavis is recognized for agricultural initiatives; Lad for cotton technology. Eleven farmers will also receive awards.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठAgriculture Sectorशेती क्षेत्र