शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सेलू बाजार समितीच्या सभापतीपदी चक्रधर पौळ तर उपसभापतीपदी प्रकाश मुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2023 19:21 IST

राष्ट्रवादी, काँग्रेस व उध्दव ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडीने नियोजनबध्द निवडणुक लढवत बाजार समितीवर वर्चस्व निर्माण केले आहे. 

सेलू : येथील बाजार समितीच्या  सभापतीपदी महाविकास आघाडीचे चक्रधर पौळ तर उपसभापतीपदी प्रकाश मुळे यांची आज निवड झाली. नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीला १८ पैकी १० तर भाजपाला ६ जागा मिळाल्या होत्या. शनिवारी बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती पदासाठी निवडणुक निर्णय अधिकारी प्रशांत थारकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन लोणीकर, सचिव राजीव वाघ यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 

महाविकास आघाडीकडून चक्रधर पौळ व उपसभापती पदासाठी प्रकाश मुळे यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले . तर भाजपकडून सभापती पदासाठी डॉ. संजय रोडगे तर उपसभापती पदासाठी प्रसाद डासाळकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यानंतर निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. यात महाविकास आघाडीचे सभापतीपदाचे उमेदवार चक्रधर पौळ व उपसभापतीपदाचे उमेदवार प्रकाश मुळे यांना प्रत्येकी बारा मते मिळाली. तर भाजपाचे उमेदवार डाॅ. रोडगे व डासाळकर यांना प्रत्येकी सहा मते मिळाली.

दरम्यान,  व्यापारी मतदार संघातील दोन्ही अपक्ष संचालकांनी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना मतदान केले. महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी भाजप च्या दोन्ही उमेदवारांचा १२ विरूध्द ६ मताने पराभव केला. दरम्यान, सार्वत्रिक निवडणुक होताच महाविकास आघाडीतील संचालक सहलीवर गेले होते. मतदानाच्या दिवशी हे सर्व संचालक थेट सभागृहात दाखल झाले. व  बाजार समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले.

उपसभापतीपदाची मुळे यांना लाॅटरीमहाविकास आघाडी कडून अगोदरच सभापती पदासाठी चक्रधर पौळ यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र उपसभापदासाठी सस्पेन्स शेवटपर्यंत होता. ऐन वेळेस प्रकाश मुळे यांना संधी देण्यात आली. 

महाविकास आघाडी मजबूतबाजार समितीची निवडणूकीत भाजप आमदार मेघना बोर्डीकर, माजी रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादी, काँग्रेस व उध्दव ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडीने नियोजनबध्द निवडणुक लढवत बाजार समितीवर वर्चस्व निर्माण केले आहे. 

निवडीनंतर जल्लोषमहाविकास आघाडीचे चक्रधर पौळ व प्रकाश मुळे यांची निवडीची घोषणा होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा करत सवाद्य शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीMarket Yardमार्केट यार्ड