कार्यक्रमास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, विजय वाकोडे, डी.एन. दाभाडे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, गौतम मुंडे, जयंती मंडळाचे अध्यक्ष आकाश लहाने, उमेश लहाने आदींची प्रमुख उपस्थिती होती. सार्वजनिक जयंती मंडळांनी कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन मिरवणूक न काढण्याचा घेतलेला निर्णय हा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकता दर्शविणारा निर्णय असून, याबद्दल जयंती मंडळाचे अध्यक्ष आकाश लहाने आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सिद्धार्थ हत्तीअंबिरे म्हणाले, सध्या कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत कोरोनाच्या नियमांचे पालन करीत जयंती साजरी करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमात १९८९ च्या जयंती मिरवणुकीतील ट्रक दुर्घटनेत शहीद झालेल्या बालकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रावस्ती महिला मंडळाच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. प्रदीप वावळे यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विकास मालसमिंदर, दिलीप वाकडे, अनिल लहाने, संजय लहाने, मुकेश लहाने, अमोल लहाने, नितीन साळवे, सचिन वाकडे, विशाल लहाने आदींनी प्रयत्न केले.