शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात कर्जमाफीचे २५८ कोटी शेतक-यांच्या खात्यावर वर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 18:51 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांपैकी ५३ हजार ८८३ शेतक-यांच्या बँक खात्यावर कर्ज माफीची रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत शेतक-यांच्या खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ५३ हजार शेतक-यांचा समावेशपरभणी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल केले होते प्रोत्साहनपर रक्कमेचा ३१ हजार शेतक-यांना फायदा

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांपैकी ५३ हजार ८८३ शेतक-यांच्या बँक खात्यावर कर्ज माफीची रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत शेतक-यांच्या खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली. 

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतक-याचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल केले. दाखल केलेल्या आॅनलाईन अर्जांचे जिल्ह्यामध्ये १ व २ आॅक्टोबर रोजी ६४४ गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण करुन ५ आॅक्टोबरपर्यंत आलेल्या आक्षेप अर्जावर तालुकास्तरीय अंमलबजावणी समितीमध्ये कार्यवाही करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील पात्र शेतक-यांच्या कुटुंबासह प्रातिनिधीक सत्कार सोहळा १८ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला; परंतु, त्यानंतर शासनाने राज्यस्तरावरुन कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतक-यांच्या नजरा ग्रीनलिस्टकडे होत्या. या कर्जमाफीवर तब्बल १ महिना कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कर्जमाफी मिळते की नाही, या विचारात जिल्ह्यताील शेतकरी अडकला होता. त्यानंतर शासनाकडून मध्यवर्ती, व्यापारी, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांना ८, २७, २८ नोव्हेंबर व ६ डिसेंबर रोजी पात्र लाभार्थी शेतक-यांच्या ग्रीनलिस्ट याद्या प्राप्त झाल्या. त्यानुसार जिल्ह्यातील ५३ हजार ८८३ शेतक-यांच्या बँक खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित १ लाख २७ हजार ५७ शेतक-यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा करणे बाकी आहे.   

प्रोत्साहनपर रक्कमेचा ३१ हजार शेतक-यांना फायदाछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची ३० जून २०१६ पूर्णत: परतफेड केलेल्या शेतक-यांनी २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची पूर्ण रक्कम ३० जून २०१७ पर्यंत परतफेड केल्यास त्यांना पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार होती. यामध्ये जिल्ह्यातील ३१ हजार ८७८ शेतक-यांच्या बँक खात्यावर ४२ कोटी २३ लाख रुपयांची  रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे प्रोत्साहनपर रक्कमेचा आतापर्यंत ३१ हजार ८७८ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी