शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

सेलूतील सराफा व्यापाऱ्यांवर अहमदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा; ५५ तोळ्याचे दागिने हस्तगत 

By ज्ञानेश्वर भाले | Updated: December 4, 2023 20:03 IST

टिमला एसपीकडून ३५ हजाराचे बक्षीस

सेलू (जि.परभणी) : अहमदनगर पोलीस पथकातील १२ जणांच्या तपासातून आरोपीस बेड्या ठोकल्यानंतर त्यांच्या घरून आणि त्यानंतर सेलूतील दोन सराफा व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले चोरीचे दागिने असा एकुण ५५ तोळे मुद्देमाल हस्तगत केला. यात व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी टिम ला ३५ हजार रूपये बक्षीस दिले अशी माहिती अहमदनगर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.           तपास अधिकारी पोउपनी अश्विनी मोरे म्हणाले की, २३ आणि २८ ऑक्टोबरला अहमदनगर येथील माणीकनगर परिसरातील डॉ. वृषभ फिरोदीया यांचे घरून ५५ तोळे, घड्याळ असा १२ लाख ५७ हजार चा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. फिर्यादीत ४ महिला नौकर अन् कलर देणारा पेंटर, आईच्या आजाराने घरी कोणी नव्हते अशा स्थितीतील गुन्हा क्लिष्ट असल्याने तपास पुढे सरकत नव्हता, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तापासकामी १२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले. ७० ठिकाणच्या १५० सिसीटीव्ही फुटेच्या तापसणीत ३ सेकंदाच्या फूटेजमुळे दिपक सर्जेराव पवार (रा.राहुरी) यांचे भोवती संशयाची सुई सुरू झाली. त्यातून राहूरी बसस्थानकात कुत्रा घेण्यासाठी आलेला दिपक पवार यास पोलीसांनी ताब्यात घेतले. सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरं देणाऱ्या दिपक पवारने चोरीची कबुली दिली. त्याच्या घरून २९ तोळे सोने दागीणे व ईतर मुद्देमाल हस्तगत केला. उर्वरित सोने दागीने सेलू येथे विक्री केल्याचे आरोपी पवार ने सांगितले.

सेलूतील व्यापाऱ्यांकडून मुद्देमाल केला हस्तगतपोउपनी गजेंद्र इंगळे हे आरोपी दिपक पवारसह कर्मचाऱ्यांना घेऊन शनिवारी सकाळी सेलूत आले. त्यांनी एका व्यापाऱ्यांच्या मुलास चौकशी केली हे सर्वजण सराफा व्यापारी अश्विन शहाणे, संदिप बहिवाल या सराफा यांचेकडे गेले. दोघांनी आरोपीकडून चोरीचे खरेदी केलेले २६ तोळे सोन्याचे दागीने पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोन्ही व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला. आरोपी दिपक पवार याला ३ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. यातून आणखीन गुन्हे व माहीती मिळेल अशी माहिती दिली.दरम्यान तपासात आरोपी व सराफा व्यापाऱ्यांची मध्यस्थी करणाऱ्यावर कारवाई होईल असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी