- अनिल जोशीझरी (जि.परभणी) : झरी ते जिंतूर मार्गावर लोअर दूधना डावा कालवाजवळ कार आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सूमारास घडली. यात कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने दुचाकीचा धडक बसून दुचाकीवरील भाऊ-बहिण या दोघांचा जागेवर मृत्यू झाला. मयत सख्खे भाऊ-बहिण असून ते परभणी येथून जिंतूरला दुचाकीवर जात होते. यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. तर कार जिंतूर येथून परभणीकडे जात होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झरीकडून जिंतूरकडे जाणारी दुचाकी क्रं (एमएच ३८ टी २२३१) व जिंतूरकडून झरीकडे येणारी (एचआर २६ डीएफ ७८९०) नंबरची कार जात होती. यात कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरासमोरील या दोन वाहनांचा अपघात होऊन दुचाकीवरील राम महादेव व्यवहारे (२१), शितल महादेव व्यवहारे (२३) (रा.वटकळी, ता.सेनगाव, जि.हिंगोली) या दोघे जागीच ठार झाले. झरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. चालक दिनेश बिरगड यांच्यासह ग्रामस्थांनी दोघांनाही परभणीच्या शासकीय रुग्णालयात हलविले.
अपघात इतका भीषण होता की, त्यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य केले. तसेच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि. जीवन राजगुरु, सपोनि. आडके, जमादार सुधीर डोंबे, तावरे आदींनी पंचनामा केला. सरकारी दवाखाना परभणी येथे दोन्ही रुग्णांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती परभणी ग्रामीण ठाण्याने दिली. तर कार चालकाने घटना स्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी सायंकाळपर्यंत कुठलाही गुन्हा नोंद झाला नव्हता. यातील मयत भाऊ-बहिण हे परभणीला बी-टेकच्या द्वितीय वर्षाच्या प्रवेशाकरीता आले होते, अशी प्राथमिक माहिती समजली.
Web Summary : A car-bike collision on the Parbhani-Jintur road killed a brother and sister instantly. The car driver lost control, hitting their bike. They were en route from Parbhani to Jintur. The car driver fled; police are investigating.
Web Summary : परभणी-जिंतूर मार्ग पर एक कार और बाइक की टक्कर में भाई-बहन की तत्काल मौत हो गई। कार चालक ने नियंत्रण खो दिया और उनकी बाइक को टक्कर मार दी। वे परभणी से जिंतूर जा रहे थे। कार चालक फरार हो गया; पुलिस जांच कर रही है।