शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद पुलावर बसचे पाटे तुटले; बसचालकाने प्रसंगावधान राखून ५७ प्रवाशांचा जीव वाचवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:42 IST

येलदरी येथील अरुंद पुलावरील घटना

ठळक मुद्देधावत्या बसचे तुटले पाटे

येलदरी (जि. परभणी) : औरंगाबादहून जिंतूर-येलदरीमार्गे रिसोडकडे जाणाऱ्या बसचे जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील अरुंद पुलावर अचानक पाटे तुटले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली घसरत असताना बसचालकाने प्रसंगावधान दाखवीत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ब्रेक लावल्यामुळे ५७ प्रवाशांचा जीव वाचल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातही आगारामध्ये मोठ्या प्रमाणात  नादुरुस्त बस आहेत. असे असतानाही नादुरुस्त बस लांबपल्यासाठी पाठविल्या जात आहेत. त्याचाच प्रत्यय १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास येलदरी येथील अरूंद पुलावर आला. येलदरी येथील पूर्णा प्रकल्पाच्या धरणावर अरुंद पूल आहे. या पुलावरून औरंगाबादहून जिंंतूर -येलदरीमार्गे रिसोडकडे जाणारी एम.एच. ०६ एस.८९०८ क्रमांकाची बस सायंकाळी ६.३० सुमारास जात असताना अचानक बसचे पाटे तुटले. त्यामुळे ही बस चक्क पुलाकडे घसरत येत असतानाच बसचे चालक विजय पदमाने यांनी प्रसंगावधान राखत  घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ ब्रेक लावले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली पडतापडता वाचली. त्यामुळे  ५७ प्रवाशांचे जीव वाचले. या बसमध्ये रिसोड, सेनगाव, हिंगोली, वाशिम आदी ठिकाणचे प्रवासी  होते. आपला जीव वाचल्याने प्रवाशांनी  बसचालकाचे आभार मानले. 

एका महिन्यातील दुसरी घटना ६ सप्टेंबर रोजी जिंतूर-रिसोड या बसला याच ठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी ६२ प्रवासी प्रवास करीत होते. बसचालक मधुकर घुगे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशांंचे जीव वाचले होते. त्यातच आता १९ सप्टेंबर रोजी येलदरी येथील याच अरुंद पुलावरून वळण घेताना बसचे पाटे तुटल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

टॅग्स :state transportएसटीAccidentअपघातparabhaniपरभणी