शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भावाने केली बहिणीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:44 IST

आईच्या नावाने असलेल्या शेतात जावून वाड्याची साफसफाई करण्यास गेल्याच्या कारणावरुन भाऊ, भावजय व त्यांच्या मुलांनी बहिणीला मारहाण केल्याची घटना २ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील दत्त मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): आईच्या नावाने असलेल्या शेतात जावून वाड्याची साफसफाई करण्यास गेल्याच्या कारणावरुन भाऊ, भावजय व त्यांच्या मुलांनी बहिणीला मारहाण केल्याची घटना २ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील दत्त मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.गंगाखेड शहरातील रहिवासी मीना रमाकांत मुरकुटे (४५) यांनी त्यांच्या आई कृष्णाबाई लक्ष्मण मुंडे यांच्या नावाने असलेली एक एकर ७ गुंठे जमीन व शेतातील जुना वाडा चार वर्षापूर्वी आईकडून विकत घेतला होता. २ जानेवारी रोजी मीना मुरकुटे व त्यांचा मुलगा शिवप्रसाद मुरकुटे हे शेतातील वाड्याची साफसफाई करण्यासाठी गेले असता सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शेतातील वाड्यात आलेल्या लहान भाऊ विजय लक्ष्मण मुंडे, भावजय कमलबाई विजय मुंडे, पुतन्या वैभव विजय मुंडे, विवेक विजय मुंडे, शहाजी बंडू मुंडे, अनिता शहाजी मुंडे, भावजय लक्ष्मीबाई बंडू मुंडे (रा.सर्व दत्तमंदिर परिसर, गंगाखेड) यांनी तू वाड्याची साफसफाई का करतेस, हा वाडा व शेत आमचे आहे, असे म्हणत शिवीगाळ केली. तेव्हा हा वाडा व एक एकर जमीन मी आईकडून विकत घेतल्याचे सांगत, मी येथून जाणार नाही, असे म्हणताच मीना मुरकुटे यांना भाऊ विजय मुंडे यांचा मुलगा विवेक मुंडे याने काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर भावजय कमलबाई मुंडे, लक्ष्मीबाई मुंडे, अनिता मुंडे या तिघींनी मारहाण केली. मुलगा शिवप्रसाद मुरकुटे हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद मीना मुरकुटे यांनी दिल्यावरुन शुक्रवारी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी