शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांनो दिव्यांगांना तरी सोडा; अपंगत्व प्रमाणपत्र काढून देण्यासाठी घेतली लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:07 IST

ही सापळा कारवाई होण्यापूर्वी तक्रारदार यांच्याकडून आरोपीने तीन हजारांची रक्कम फोन पेद्वारे घेतली होती.

परभणी : अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा सामान्य रुग्णालयातून काढून देण्याकरिता एका खासगी इसमाने तक्रारदाराकडे सात हजारांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी लावलेल्या सापळ्यामध्ये या खासगी इसमाने दोन हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीस पथकाने ताब्यात घेतले. 

विष्णू बापूराव कोरडे (३२, व्यवसाय : खासगी नोकरी, रा.ठाकरे नगर, परभणी) असे आरोपीचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणीकडे तक्रारदाराने मंगळवारी तक्रार दिली होती. तक्रारदार यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढावयाचे होते. यातील तक्रारदार यांना विष्णू कोरडे याने त्याची जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांसोबत ओळख आहे, असे सांगितले. अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढून देण्याकरिता विष्णू कोरडे याने तक्रारदार यांच्याकडून यापूर्वी तीन हजार रुपये घेतले होते. याबाबत बुधवारी विभागाने केलेल्या सापळा पडताळणीत पंचांसमक्ष विष्णू कोरडे याने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. या प्रकरणात अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अजून पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे, मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार, मो.जिब्राहिम, घुले, कदम यांच्या पथकाने केली.

फोन पेवर यापूर्वी घेतली होती रक्कमही सापळा कारवाई होण्यापूर्वी तक्रारदार यांच्याकडून आरोपीने तीन हजारांची रक्कम फोन पेद्वारे घेतली होती. अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पडताळणी दरम्यान दोन हजार रुपयांची रक्कम आरोपीने मागितली आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पाच हजार रुपये द्यावे लागतील, असेही तक्रारदारास सांगितले होते. त्यावरून सापळा कारवाई केली असता त्यात दोन हजारांची लाच आरोपीने पंचासमक्ष स्वीकारली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागparabhaniपरभणी