शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सॅल्यूट! जीवाची बाजी लावणाऱ्या कर्मचाऱ्यास बढती; पोलीस अधीक्षकांनी घरी जाऊन लावले 'स्टार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 14:03 IST

रुग्णालयातून घरी परतताच पोलीस अधीक्षकांनी पदोन्नतीचे 'सरप्राईज' देत निलेश भुजबळांचा सन्मान केला

- राजन मंगरूळकर परभणी : दरोडेखोरांना पकडण्यास गेलेल्या स्थागुशा पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश भुजबळ हे १६ मार्चला रात्री आरोपीने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावल्याने या चोख कर्तव्याचा सन्मान पोलीस अधीक्षक यांनी कर्मचारी निलेश भुजबळ यांच्या घरी जाऊन केला.

पोलीस दलात सेवेचा नियत कालावधी पूर्ण केल्यानंतर मिळालेली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची पदोन्नती त्यांना अधिकाऱ्यांनी खांद्यावर स्टार लावून दिली. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्यासह कर्मचारी आणि भुजबळ कुटुंबीय उपस्थित होते. 

परभणी जिल्हा पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बनलेले निलेश भुजबळ यांनी एकूण २४ वर्षे सेवा बजावली. या २४ वर्षाच्या सेवेत त्यांनी तब्बल ७४५ बक्षीस मिळविले. कोणतीही शिक्षा आजपर्यंत त्यांना सेवेच्या कालावधीत झालेली नाही. स्थागुशा  पथक चारठाणा हद्दीत कारवाईला गेले असता आरोपीने निलेश भुजबळ याच्या पाठीत चाकूचे वार केले यात गंभीर जखमी झालेल्या भुजबळ यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे विशेष पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप सह पोलिस अधीक्षकांनी भुजबळ यांची भेट घेतली. आता वैद्यकीय रजेवर असताना त्यांना विहित सेवा पूर्ण केल्याने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीचे आगळे वेगळे गिफ्ट थेट पोलीस अधीक्षकांनी भुजबळ यांच्या घरी जाऊन कुटुंबा समवेत त्यांना खांद्यावर स्टार लावून बहाल केले. 

आजचा दिवस माझ्यासाठी अभिमानाचा, अविस्मरणीय ठरला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील  यांनी मला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर मिळालेली पदोन्नती त्यांनी स्वतः माझ्या घरी येऊन, माझ्या कुटुंबीयांसमोर माझ्या खांद्यावर स्टार लावून मला सन्मानित केले. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात  गौरवाचा, अविस्मरणीय ठरला. - निलेश भुजबळ, सपोउपनि.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Cop Gets Promotion After Heroic Act; Superintendent Pins Star at Home

Web Summary : Seriously injured while arresting robbers, Constable Nilesh Bhujbal was promoted to Assistant Sub-Inspector. The Superintendent of Police honored Bhujbal at his home, pinning the stars on his uniform in front of his family, recognizing his 24 years of exemplary service and bravery.
टॅग्स :Policeपोलिसparabhaniपरभणी