शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत खराब रस्त्यामुळे १० गावांना जोडणा-या २४ बसफेर्‍यांना ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 19:23 IST

दररोज १५ हजार रुपये उत्पन्न देणार्‍या परभणी ते कुंभारी या मार्गावरील बसफेर्‍या बंद करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे. रस्ता चांगला नसल्याने महामंडळ या निर्णयापर्यंत आले आहे. यामुळे प्रवाशांच्या त्रासाबरोबरच महामंडळाला उत्पन्नावरही पाणी सोडावे लागणार आहे.

परभणी : दररोज १५ हजार रुपये उत्पन्न देणार्‍या परभणी ते कुंभारी या मार्गावरील बसफेर्‍या बंद करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे. रस्ता चांगला नसल्याने महामंडळ या निर्णयापर्यंत आले आहे. यामुळे प्रवाशांच्या त्रासाबरोबरच महामंडळाला उत्पन्नावरही पाणी सोडावे लागणार आहे.

कुंभारी ते परभणी हे २५ कि.मी.चे अंतर आहे. या मार्गावर टाकळी, शहापूर, तुळजापूर, आर्वी, वाडी, गोविंदपूर, इस्माईलपूर, कुंभारी बाजार, डिग्रस, कार्ला, कुंभारी दुधना आदी १० गावांतील प्रवासी दररोज एस.टी. बसने प्रवास करतात. परभणीला कामानिमित्त येणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परभणी आगाराला या बससेवेतून मोठे उत्पन्नही मिळते. मात्र एक -दोन वर्षापासून टाकळी कुंभकर्ण ते कुंभारी बाजार या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी शहापूर ते कुंभारी बाजार हा रस्ता दुरुस्त करण्यात आला. मात्र टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा रस्ता ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे महामंडळाच्या बस या रस्त्यावरुन ये-जा करताना टायर पंक्चर होणे, स्प्रिंग तुटणे यासह इतर आर्थिक नुकसान महामंडळाला सहन करावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यातून बस चालविताना चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चालक व वाहकांच्या अनेक तक्रारी आगारप्रमुख डी.बी.काळम पाटील यांच्याकडे आल्या होत्या. त्यावरुन काळम पाटील यांनी तहसीलदार, विभागीय नियंत्रक, ग्रामपंचायत यांना पत्र पाठवून समस्येची माहिती दिली. मात्र रस्ता दुरुस्तीकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी आगारप्रमुख  काळम पाटील यांनी रस्त्याअभावी परभणी ते कुंभारी ही बस ७ जानेवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बस बंद झाल्यास १० गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी लक्ष देऊन या प्रश्नी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

अवैध वाहतुकीला मिळणार  चालनापरभणी- कुंभारी या रस्त्यावरुन ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या रस्त्याला जवळपास १० गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे या गावातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पर्यायाने प्रवासी या रस्त्यावर चालणार्‍या अवैध वाहतुकीकडे वळतील. त्यामुळे यावर जिल्हा प्रशासनाने तोडगा काढून ७ जानेवारीपासून बंद करण्यात येणारी बस पूर्ववत चालू ठेवावी. प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याकडे एसटी महामंडळ व जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढलेटाकळी कुंभकर्ण ते शहापूर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा संबंधितांना पत्र व्यवहार केला. परंतु, कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे परभणी ते कुंभारी बस ७ जानेवारीपासून बंद करावी लागत आहे.- डी.बी.काळम पाटील, आगारप्रमुख

काम सुरु आहे टाकळी कुंभकर्ण ते शहापूर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. या रस्ता कामाच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरु आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. -शिराढोणगावकर, अभियंता