शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर- टेम्पोच्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा, एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:56 IST

पाथरी-आष्टी रस्त्यावर अपघात मालिका सुरूच; ट्रॅक्टर- टेम्पोच्या समोरासमोर धडकेत टेम्पोतील एक गंभीर जखमी

- विठ्ठल भिसे पाथरी : ऊस वाहतूक करणार ट्रॅक्टर आणि टेम्पोची वडी पाटीजवळ समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता झाली. या अपघातामध्ये टेम्पोमधील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले आहे. धडक एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. ट्रॅक्टरचे तर हेड तुटून पडले आहे. 

शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पाथरी -आष्टी रस्त्यावर ट्रॅक्टर ( एम एच 44 डी 2976) पाथरी येथून ऊस घेऊन जात होता. याच वेळी आष्टीकडून एक टेम्पो ( एमएच 21 एक्स 2458) भरधाव वेगाने येत होता. वडी पाटीजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. ट्रॅक्टरचे तर हेड तुटून बाजूला पडले. 

दरम्यान, टेम्पोमध्ये आदित्य अशोक कोल्हे (22, रा आष्टी ) हा तरुण अडकून पडला. माहिती मिळताच पाथरी पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी टेम्पोमध्ये अडकलेल्या गंभीर जखमी आदित्य यास बाहेर काढले. त्याच्यावर पाथरी येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यास अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले. 

पाथरी-आष्टी रस्त्यावर अपघात मालिका सुरूचपाथरी ते आष्टी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडेझुडपे रस्त्यावर आली आहेत. काही ठिकाणी साईड पट्टीची कामे करण्यात आली नाहीत. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दर आठ दिवसांत एक अपघात घडत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात