शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

पालम बाजार समितीची दोन्ही पदे बिनविरोध; सभापतीपद राष्ट्रीय समाज पक्षाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 15:18 IST

पालम बाजार समिती निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसेनेच्या (शिंदे गट) पॅनलने 18 पैकी 14 जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

पालम: बाजार समितीच्या सभापतीपदी अपेक्षेनुसार गजानन गणेशराव रोकडे यांची निवड झाली असून अपेक्षितरित्या उपसभापतीची माळ भाऊसाहेब शिवाजीराव पौळ यांच्या गळ्यात पडली. उभयतांच्या निवडी बिनविरोध झाल्या असून अवघ्या तासाभरात निवडणूक प्रक्रिया आटोपली. तदनंतर फटाक्यांची अतिषबाजी करीत पालम शहरातून मिरवणूक काढण्यात आली. 

पालम बाजार समिती निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसेनेच्या (शिंदे गट) पॅनलने 18 पैकी 14 जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यात शिवसेनेच्या 3 संचालकांनी बाजी मारली होती. तत्पुर्वीच, सभापतीपती पदाचे उमेदवार म्हणून गजानन रोकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याप्रमाणे उपसभापती देखील रासपचा होईल, अशी चर्चा होती. त्यानुसार उपसभापतीपदासाठी रासपकडून दोघांनी मोर्चेबांधणी केली होती. तोपर्यंत शिवसेना स्पर्धेत नव्हती आणि त्यांना उपसभापतीपद देण्याचे ठरले नव्हते. तरीही शिवसेनेने अखेरच्या चार दिवसांत प्रतिष्ठा पणाला लावली. त्यासाठी मंबई येथून ताकत लावल्याने पौळ यांची लॉटरी लागली. 

वास्तविक, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि रासप प्रदेश उपाध्यक्ष गमेशराव रोकडे यांचा संचालकांच्या पंचवार्षिक निवडणुकीत सिंहाचा वाटा आहे. तरीही मंगळवारी सकाळी विशेषसभेत पुर्वनियोजितरित्या रासपचे गजानन रोकडे यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. त्यासोबत शिवसेनेकडून शिवसेनेचे भाऊसाहेब पौळ यांनी उमेदवारी दाखल केली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आले. म्हणून अध्यासी अधिकारी किशन फिस्के यांनी सभापतीपदी गजानन रोकडे तर उपसभापतीपदी भाऊसाहेब पौळ यांची बिनविरोध निवड केली. 

अध्यासी अधिका-यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी विजय देखणे, सचिव आत्माराम महेंद्रकुमार रोहिणीकर यांनी सहाय्य केले. विशेष सभेला रासपचे संचालक प्रल्हाद विक्रम कराळे, शामराव दत्तराव काळे, मोतीराम रावसाहेब खंडागळे, रमेश माधवराव गायकवाड, ज्योती दिपेंद्र पाटील,  महादेव नागनाथ खेडकर, डॉ. रामराव किशनराव उंदरे, अतुल रामचंद्र धुळगुंडे, भारत प्रभाकर सिरस्कर, ज्ञानेश्वर पांडुरंग घोरपडे, शिवसेननेचे गणेश विठ्ठलराव हत्तीअंबिरे, छायाबाई शिवाजी राऊत आणि महाविकास आघाडीचे तुषार काशिनाथराव दुधाटे, कमलबाई किशनराव काळे, विष्णूदास नारायणराव शिंदे, दिपक रामराव रुद्रावार उपस्थित होते. 

निवडीनंतर सभापती व उपसभापतीच्या निवडीवेळी जिल्हा बँकेचे संचालक गणेशराव रोकडे, माजी खासदार एड. सुरेशराव जाधव, लोहा भाजपचे नेते एकनाथ पवार, पाथरीचे उपनगराध्यक्ष रासवे, शिवसेनेचे नेते असेफ खान, नगरसेवक बालासाहेब रोकडे, लालखाँ पठाण, अप्पासाहेब केरवाडीकर, खरेदी विक्री संघाचे संचालक विजय घोरपडे, माधवराव गिनगिने, गटनेते लोंढे उपास्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीmarket yardमार्केट यार्ड