शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारच्या धडकेत लाडके बैल 'सर्जा-राजाचा' मृत्यू; शेतकरी पिता-पुत्र थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:55 IST

भरधाव कारच्या धडकेत बैलगाडी चकनाचूर झाली, एक बैल २० फुट दूर फेकला गेला

पाथरी - शेतातून चारा घेऊन येत असलेल्या बैलगाडीचा आणि नांदेडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव कारचा भीषण अपघात बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पाथरी पोखरनी रस्त्यावर पोहेटाकळीजवळ झाला. यात दोन्ही बैल ठार झाले .तर बैलगाडी चालक शेतकरी आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी आहेत. अपघात ऐवढा भीषण होता की धडकेमुळे एक बैल बैलगाडीपासून २० फुट दूर फेकला गेला.

पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील भागवत रोहिदास गिराम आणि वैभव भागवत गिराम हे बैलाला चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडी घेऊन गेले होते. रात्री 8.30 ते 9 वाजेच्या सुमारास बैलगाडीत चारा घेऊन दोन्ही पिता-पुत्र घरी परतत होते. दरम्यान, नांदेडहून छत्रपती संभाजीनगरकडे एका कार भरधाव वेगात जात होती. पोहेटाकळी जवळ बैलगाडी आणि कारची जोरदार धडक झाली. यात एक बैल तब्बल 15 ते 20 फूट दूर जाऊन फेकला जाऊन जागीच गतप्राण झाला. तर दुसरा बैल गंभीर जखमी होता. त्याचा देखील उपचार सुरु असताना मृत्यू झाला. भीषण अपघातात बैलगाडी चकनाचूर झाली आहे. बैलगाडी चालक शेतकरी भागवत रोहिदास मगर आणि वैभव मगर हे दोघेही यात जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अपघातस्थळी पोलिसांनी धाव घेतली.

 

टॅग्स :AccidentअपघातparabhaniपरभणीFarmerशेतकरी