शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बहरलेला कापूस, सोयाबीनची माती; परभणी जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित

By मारोती जुंबडे | Updated: September 3, 2024 18:30 IST

कृषी विभागाचा अहवाल : नदी काठावरील शेतांमध्ये सर्वाधिक नुकसान

परभणी : रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत जिल्ह्यात १३८ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. ५२ पैकी ५० मंडळात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने जिल्ह्यात २ लाख ९८ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे.

दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पाथरी मंडळात तर जणू काय अभाळ फाटल्याची स्थिती निर्माण झाली. २२९ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. या पावसाने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. त्यामुळे या पुराचे व पावसाचे पाणी अनेकांच्या शेतामध्ये शिरले. या पाण्यामुळे सोयाबीन, तूर व कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी चिंताग्रस्त झाले असताना नेमके अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले, याचा आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आला. त्यानुसार अहवाल ही तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार दि. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे २ लाख ९८ हजार ३५६ हेेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना शासन काय मदत करते? याकडे जिल्ह्यातील बळीराजांचे लक्ष लागले आहे.

परभणी तालुक्यात सर्वाधिक ६२ हजार हेक्टर बाधितजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या अहवालामध्ये २ लाख ९८ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील ८३ हजार ८९ हेक्टर क्षेत्रापैकी ६२ हजार ३१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पूर, अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

असे झाले तालुकानिहाय नुकसानजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार परभणी तालुक्यात सर्वाधिक ६२ हजार ३१६, गंगाखेड २७ हजार, सोनपेठ १६ हजार ८१, पालम २९ हजार ९४०, पाथरी ३२ हजार ६१६, मानवत २६ हजार ११५, जिंतूर ३९ हजार ४८९, पूर्णा २७ हजार ५९५, तर सेलू तालुक्यात ३७ हजार २१० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहेत.

पालकमंत्र्यांना वेळ मिळेनापरभणी जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन जवळपास ५० टक्क्यांपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी ही पिके वाढविली होती. मात्र सोमवार आणि रविवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिके मातीमोल झाली आहेत. परंतु, अद्यापही पालकमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून जिल्ह्याच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आलेला नाही किंवा पालकमंत्र्यांना परभणीत येण्यास वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी