शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवस ठरला शेवटचा; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची शेतात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 18:46 IST

तरुण मागील काही दिवसांपासून औरंगाबादेत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असे.

मानवत : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका २० वर्षीय युवकाने आज वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी झरी येथे घडली. निलेश शिवाजी सत्वधर असे मृत युवकाचे नाव आहे.  

पाथरी तालुक्यातील झरी हे गाव मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. या गावातील निलेश शिवाजी सत्वधर (२०) हा पदवीधर युवक औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. महिनाभरापूर्वी तो गावाकडे आला होता. आज सकाळी १०  वाजता तो झरी शिवारातील स्वतःच्या शेतात गेला. त्यानंतर ११.३० वाजेच्या दरम्यान निलेशचे वडील शिवाजी सत्वधर आणि भाऊ महेश शेतात गेले असता त्यांना निलेशने लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेतल्याचे आढळून आले. माहिती मिळताच सपोउनि अशोक ताठे, रोहीत पोतदार घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करून त्यांनी पंचनामा केला. निलेशचा वाढदिवसाच्या होता  

वाढदिवसी केली आत्महत्या निलेश मागील काही दिवसांपासून औरंगाबादेत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असे. आज त्याचा वाढदिवस होता. सकाळी तो शेतात गेला आणि वाढदिवसीचा त्याने आत्महत्या करून स्वतःल संपवल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. निलेशचा भाऊ जीवन सत्वधर यांच्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी